आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 50 Crore Donation To 'AAP' On Promise To Send It To Rajya Sabha, Rs 10 Crore Given To Satyendar Jain For Jail Security

गुंड सुकेश चंद्रशेखरचा आरोप:राज्यसभेत पाठवण्याच्या आश्वासनावर ‘आप’ला 50 कोटींची देणगी, सत्येंद्र जैन यांना 10 कोटी रुपये

वृत्तसंस्थाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या मंडोली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर या गुंडाने आप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तुरुंगातील सुरक्षेसाठी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. मला राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन दिल्यावर मी पक्षाला ५० कोटी रुपये दिले, असा दावाही सुकेश यांनी केला. सुकेश यांच्या वकिलाने मंगळवारी सांगितले की, सुकेश यांनी गेल्या महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांना पत्र लिहून या आरोपांची

सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. जैन यांना २०१५ पासून ओळखत असल्याचे सुकेशने सांगितले. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्या बदल्यात त्यांनी आम आदमी पार्टीला ५० कोटी रुपयेही दिले. अटकेनंतर दिल्लीचे तत्कालीन तुरुंगमंत्री सत्येंद्र जैन यांनी माझी तिहार तुरुंगात अनेक वेळा भेट घेतल्याचाही दावा सुकेशने केला. २०१९ मध्ये जैन यांनी तुरुंगातील सुरक्षेसाठी दरमहा २ कोटी रुपये देण्यास सांगितले. दोन-तीन महिन्यांत त्यांनी जैन यांना १० कोटी रुपये दिले. आणि डीजी जेल संदीप गोयल यांना १२.५० कोटी रुपये दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचा ‘आप’ वर हल्ला, हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष : पात्रा सुकेशच्या पत्राचा खुलासा झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘आप’ हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. आतापर्यंत हा पक्ष जनतेचा पैसा लुटत होता, पण आता ताे बड्या गुन्हेगारांकडून पैसे उकळत आहे. पात्रा म्हणाले, दारू आणि शिक्षण घोटाळ्यानंतर नवीन प्रकरण समोर आले आहे. भ्रष्टाचार कसा करायचा हे फक्त आम आदमी पक्षालाच माहीत आहे हे यावरून सिद्ध होते.

बातम्या आणखी आहेत...