आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की, UK मध्ये पाठवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कोवीशिल्ड व्हॅक्सीनचे 50 लाख डोस आता निर्यात केले जाणार नाहीत. या ऐवजी हे डोस देशामध्येच 18 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी सुरू झालेल्या व्हॅक्सीनेशन प्रोग्राममध्ये वापरले जातील.
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये कोवीशील्ड बनवली जात आहे. या इंस्टीट्यूटमध्ये गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्स डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह यांनी नुकतेच केंद्र सरकारला एक पत्र लिहून व्हॅक्सीन UK मध्ये पाठवू नये अशी परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने याची परवानगी देत हे डोस आता राज्यांना सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
UK साठी ठेवण्यात आलेले जे 50 लाख डोस होते आता ते देशात वापरले जातील. हे डोस 21 राज्यांमध्ये पाठवले जातील. काही राज्यांना 3.5-3.5 लाख डोस मिळतील. काही राज्यांना एक-एक लाख डोस मिळतील. दोन राज्यांना 50-50 हजार डोस पाठवले जातील. सरकारने राज्यांमध्ये कोरोना प्रकरणे पाहता तेथे पाठवल्या जाणाऱ्या लसींचे वर्गीकरण केले आहे.
लेबलवर कोवीशील्ड नाही, एस्ट्राजेनेका लिहिलेले असेल
ही व्हॅक्सीन एक्सपोर्ट करण्यासाठी ठेवण्यात आली होती, यामुळे यावर कोवीशील्ड ऐवजी ‘कोविड-19 व्हॅक्सीन एस्ट्राजेनेका’चे लेबल लावलेले असेल. आता सरकारने राज्यांना म्हटले आहे की, त्यांनी थेट कंपनीशी संपर्क साधावा आणि डोस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
सीरमचा UK सोबत करार झाला होता
सीरम इंस्टीट्यूटने यापूर्वी 23 मार्चला सरकारला 50 लाख डोस UK मध्ये पाठवण्याची परवानगी मागितली होती. तेव्हा सीरम इंस्टीट्यूटचे म्हणणे होते की, त्यांचे एस्ट्राजेनेकासोबत अॅग्रीमेंट आहे. यामुळे हे डोस पाठवणे गरजेचे आहे आणि देशात होणाऱ्या पुरवण्यात अडथळा येऊ देणार नाही.
एडेनोव्हायरसने बनली आहे कोवीशील्ड
कोवीशील्ड एक व्हायरल वेक्टर व्हॅक्सीन आहे. यामध्ये चिम्पांजीमध्ये आढळणारे एडेनोव्हायरस ChAD0x1 चा वापर करुन कोरोना व्हायरस सारखाच स्पाइक प्रोटीन बनवण्यात आला आहे. हे शरीरात जाऊन याविरोधात प्रोटेक्शन विकसित करते. याचे दोन डोस दिले जातात. दोन्ही डोसमध्ये 42 ते 56 दिवसांचे अंतर ठेवले जाते. कोवीशील्ड 70% पर्यंत प्रभावी आहे. सरकारने मे, जून आणि जुलैसाठी कोवीशील्डसाठी 11 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.