आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात लक्झरी उत्पादनांच्या विक्रीचे िवक्रम नाेंदवले जात आहेत. मार्केट डेटानुसार वर्षभरात लक्झरी कारची विक्री ५० टक्के वाढली. महागडे स्मार्टफाेन, माेठे टीव्ही-फ्रिज इत्यादीच विक्री सर्वाधिक ५५-९५ टक्क्यांहून जास्त राहिली. स्विस घड्याळांचा बाजारही तेजीत हाेता. त्याउलट मात्र टूथपेस्ट, केश तेल, साबणासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या विक्रीचा वेग अतिशय कमी आणि नकारात्मक दिसून आला. कमी उत्पन्न असलेल्या वर्गात मागणी असलेल्या माेबाइलची विक्री कमी झाली. दुचाकी वाहनांच्या विक्रीतही वाढ नाही.
बचत-खर्चावर काम करणाऱ्या संस्थांनी धक्कादायक वास्तव मांडले. काेविड-१९ व लाॅकडाऊनचा परिणाम टाॅप २० टक्के उत्पन्न असलेल्या वर्गावर झाला नाही. त्यामुळे हा वर्ग बाजारपेठ खुली हाेताच लक्झरी उत्पादनांच्या खरेदीला लागला. कमी उत्पन्न असलेला २० टक्के वर्ग अजून यातून बाहेर पडला नाही. हा वर्ग गरजेच्या वस्तूही विचारपूर्वक खरेदी करताे. त्याला धक्क्यातून सावरण्यासाठी एक वर्ष लागू शकते.
माेठ्या शहरांत लहान-माेठ्या दोन्ही खर्चांत वाढ
श्रीमंतांचा खर्च यामुळे वाढला..
{कार कंपनीच्या डेटानुसार २०२२ मध्ये लक्झरी कारची विक्री ५० टक्के वाढून ३७,००० युनिट झाली. १ काेटींहून जास्त किमतीच्या १० हजार कारची विक्री झाली. मर्सिडीज बेंझने ६५०० कारची विक्री केली. {इंटरनॅशनल डेटा काॅर्पाेरेशननुसार ४१ हजारांहून महागड्या माेबाइलची विक्री २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये ५५ टक्के वाढली.
{फेडरेशन आॅफ स्विस वाॅच इंडस्ट्रीनुसार लाइफस्टाइल स्विस वाॅचेसची विक्री २०२२ मध्ये ती रक्कम १६४० काेटी रुपये राहिली. २०२० मध्ये ती ८४३ काेटी रुपये हाेती.
{जीएफके मार्केट इंटेलिजन्सनुसार ५५ इंचाहून माेठ्या अल्ट्रा एचडी टीव्हीची विक्री २०२१ च्या तुलनेत ९५ टक्के वाढली.
कमी उत्पन्न वर्गाचे खिसे रिकामे
{िरटेल इंटेलिजन्स फर्म बिजाेमनुसार
डिसेंबर-२२ च्या तिमाहीत लहान शहरांत टूथपेस्ट, नूडल्स, हेअर आॅइलसारख्या एफएमसीजी उत्पादनांची िवक्री ०.२ टक्क्यांहून कमी हाेती. माेठ्या शहरांत ही विक्री ४ टक्के वाढली. सहा महिन्यांत ग्रामीण व अर्धशहरी बाजार ०.८ टक्के काेसळला.
{सियामचे आकडे मानल्यास जानेवारी २० मध्ये देशात १३,४०,९८९ दुचाकी वाहनांची िवक्री झाली. जानेवारी-२३ मध्ये १३,१८,१८२ वाहनांची िवक्री झाली. म्हणजे तीन वर्षांत दुचाकी विक्रीत वाढ झाली नाही. यादरम्यान पॅसेंजर कारच्या विक्रीतील वाढ केवळ २३ टक्के राहिली.
{२५ हजारांहून कमी किंमतीच्या स्मार्टफाेनच्या विक्रीत १५ टक्के घट झाली.
लाइफस्टाइल उत्पादनांच्या विक्रीत घट शक्य
सर्वात कमी उत्पन्न असलेल्या गटाला या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणखी एक वर्ष लागेल. लाइफस्टाइल प्राॅडक्टची िवक्रीही पुढील वर्षी यंदा इतकी राहणार नाही. त्यात घट हाेऊ शकते. - राजेंद्र शुक्ला, एमडी अँड सीईओ, प्राइस, नवी दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.