आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 50 Percent Reservation For Women, Even In Open Class, Where Do We Go? Strange Complaints To The Election Commission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरुषांची गाऱ्हाणी:महिलांना 50 टक्के आरक्षण, खुल्या वर्गातही लढताहेत, आम्ही कुठे जायचे? निवडणूक आयाेगाकडे अजब तक्रारी

सिमलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात अलीकडे निवडणूक आयाेगाला लाेकांच्या विचित्र स्वरूपाच्या तक्रारी मिळू लागल्या आहेत. देहरातील एका व्यक्तीने आरटीआयअंतर्गत तक्रार दिली आहे. त्यानुसार महिलांना ५० टक्के आरक्षण असताना त्या खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवू लागल्या आहेत. मग पुरुषांनी जायचे तरी कुठे? असे गाऱ्हाणे यात मांडण्यात आले आहे. परंतु ही बाब माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत येत नाही, असे सांगून आयाेगाने उत्तर देण्यास नकार दिला.

लाेक निवडणुकीत गदाराेळ व चुकीच्या मतमाेजणीची तक्रारही आयाेगाकडे करू लागले आहेत. मतदार यादीत नाव नसल्याबद्दलही आयाेगाकडे तक्रारी मिळाल्या आहेत. या तक्रारी लक्षात घेऊन आयाेगाने लाेकांना संबंधित अधिकाऱ्यांकडे निवडणुकीची याचिका दाखल करण्याची सूचना केली आहे.

निवडणूक आयाेगाने पंचायत व नगरपालिकांत उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाचा तपशील २४ फेब्रुवारीपर्यंत देण्याची सूचना केली आहे. निवडणूक खर्चाचा तपशील दिला नाही तर उमेदवाराला पुढील निवडणुकीपर्यंत अपात्र जाहीर केले जाणार आहे. यादरम्यान एखाद्या व्यक्तीला पंचायत किंवा स्थानिक निवडणुकीसंबंधी एखादी तक्रार असल्यास ते आयाेगाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता. त्यानंतर त्यांना आपली तक्रार दाखल करण्याची संधी मिळणार नाही.पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित तक्रारींना लाेक एसडीएमकडे दाखल करू शकतात. अशा प्रकारे जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारींना जिल्हाधिकारी दर्जा असलेल्या अधिकाऱ्यांकडे नाेंदवता येईल.

बातम्या आणखी आहेत...