आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 50 year old Anganwadi Worker Brutally Murdered After Being Gang raped In Uttar Pradesh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP मध्ये निर्भयाची पुनरावृत्ती!:50 वर्षीय अंगणवाडी सेविकेची सामुहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या, गुप्तांगात खुपसला रॉड, पाय-बरगडी तोडली

बदायूं4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिरातील पुजारी, त्याचे शिष्य आणि ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील उघैती येथे पूजेसाठी मंदिरात गेलेल्या तीन मुलांच्या आईवर सामूहिक बलात्कारानंतर तिच्यावर नृशंस कृत्ये करण्यात आली. यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महंत सत्यनारायण दास, शिष्य वेदराम व चालक जसपालविरुद्ध सामूहिक बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल केला.

ही ५० वर्षीय महिला रविवारी गावातील मंदिरात पूजेसाठी गेली होती. एफआयआरनुसार, मंदिरातील महंत सत्यनारायण, वेदराम व जसपालने सामूहिक बलात्कारानंतर तिच्याशी नृशंस कृत्य केले. यात तिचा मृत्यू झाला. त्याच रात्री ११ वाजता महंताने आपल्या जीपमधून महिलेचा मृतदेह तिच्या घरी नेला. विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. ४८ तासांनी महिलेचे पोस्टमॉर्टेम झाले. पोलिसांनी बुधवारी २ आरोपींना अटक केली. मुख्य आरोपी महंत फरार असून त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांच्या बक्षिसाची घोषणा झाली आहे. उघैतीतील ठाणे प्रभारी राघवेंद्र प्रताप सिंह याला निलंबित करण्यात आले आहे.

बरगड्या तुटल्या, गुप्तांगात रॉड, पायही मोडला

पोस्टमाॅर्टेम रिपोर्टनुसार, महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुप्तांगात राॅड टाकल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिच्या बरगड्या तुटलेल्या होत्या. डावीकडील फुप्फुसही फाटलेले होते. तसेच तिचा डावा पायही मोडलेला होता. डॉक्टरांनुसार, अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...