आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामासाठी दान:रोज येत आहेत 500 फोन, मंदिरात दानासाठी केली जातेय विचारणा, लॉकडाऊनमध्येही क्विंटलभर चांदी आणि 5 कोटी रुपये मिळाले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दानासाठी कायदेशीर अभियान चालवणार, जाहीराती दिल्या जातील आणि सोशल मीडियावर कॅम्पेनही, ट्रस्टचे लोक दान मागण्यासाठी गावोगाव आणि घराघरात जातील
  • 500 पेक्षा जास्त कलश कार्यालयात पोहोचले आहेत, यामुळे एक खोली भरली आहे, लोक कुरिअरच्या माध्यमातून चेक आणि माती पाठवत आहेत

5 ऑगस्टला श्री रामचंद्राच्या मंदिरासाठी भूमिपूजनाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 100 कोटींनी तयार होणाऱ्या मंदिरासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला भक्तही पुष्कळ देणगी व देणग्या पाठवत आहेत. कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत की सध्या त्यांना सुमारे 15 कोटी रुपये दान आलेले आहेत.

लॉकडाऊनमध्ये सर्वात मोठे दान हे 2 कोटींचे आले. गेल्या पाच महिन्यांमध्येही जवळपास 5 कोटी रुपये आले आहेत. तर यापूर्वीच दानात आलेले 10 कोटी रुपये आहेत. मोरारी बापूंनी ज्या फंडमध्ये 5 कोटी रुपये देण्यासाठी लोकांना अपील केली होती. त्यामध्ये 18 कोटी रुपये आले आहेत.

अशाप्रकारे जवळपास 33 कोटी रुपयांचे दान ट्रस्टजवळ असल्याचे मानले जाऊ शकते. पटनाच्या हनुमान मंदिराच्या महावीर ट्रस्टमधूनच 2 कोटींची देणगी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महावीर ट्रस्ट 10 कोटी रुपयांची देणगी देणार आहे. प्रत्येक वर्षी 2-2 कोटी पाठवले जातील.

या व्यतिरिक्त ट्रस्टच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आले आहे की, मंदिराच्या दानासाठी कायदेशीर अभियान चालवले जाईल. यासाठी जाहिरात दिली जाईल आणि सोशल मीडियावर कँपेन चालवण्यात येईल. ट्रस्टचे लोक गावागावात, घरा-घरात जातील आणि सेवेसाठी मागणी करतील. यासोबतच देशातील मोठे बिझनेसमन आणि नेत्यांनाही दान करण्याचे आवाहन करतील.

ट्रस्टच्या कार्यालयात रोज दान कुठे करावे या विचारणेसाठी 500 फोन येतात

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी राम प्रकाश गुप्ता सांगतात की, आम्ही दानासाठी अकाउंट डिटेल प्रत्येक ठिकाणी दिली आहे. सोशल मीडियावरही दिली आहे. मात्र तरीही दररोज जवळपास विचारपूससाठी पाचशे फोन येतात. कुणी 500 तर कुणी 5000 रुपये रामलल्लाला देऊ इच्छितो.

लोक म्हणतात की, सध्या ऑनलाइन फ्रॉड मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे त्यांना खात्याचा तपशील एकत्रित करायचा आहे. ते म्हणतात, लोक कुरिअरद्वारे आणि पोस्टद्वारे धनादेश पाठवित आहेत. कोरोनामुळे अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी बाहेरून कमी लोक येत आहेत, जेव्हा लोक यायला लागतील तेव्हा देणग्या आणखी वाढतील.

क्विंटलपेक्षा अधिक चांदी आणि 500 ​​हून अधिक कलश आले आहेत

देशभरातून लोक राममंदिराला चांदीच्या विटा भेट देण्याची मागणी करत आहेत. मात्र ट्रस्ट शिलांची गणना करत आहेत जे कार्यालयाच्या रिकॉर्डमध्ये येत आहे. अंदाज आहे की, आतापर्यंत क्विंटलभरपेक्षाही जास्त शिला आल्या आहेत. ट्रस्टने अपली केली आहे की, चांदीच्या विट देण्याऐवजी अकाउंटमध्ये पैसे पाठवावे.

दरम्यान 500 हून अधिक कलश कार्यालात पोहोचले आहेत. यानेच एक खोली भरली आहे. यात तळव्याच्या आकारापासून मोठ्या फुलांच्या फुलदाण्यापर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. लोक कुरिअरद्वारे काही माती देखील पाठवित आहेत. कुरिअर ऑफिसमध्ये ठिग लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...