आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 51 Country Made Bombs Recovered Near BJP Office In Kolkata, Police Seized The Bag

धक्कादायक:कोलकातामधील भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 देशी बॉम्ब, परिसरात खळबळ

कोलकाता14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानसभा निवडणुकीदरम्यान शंभरपेक्षा जास्त बॉम्ब सापडले

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून 51 क्रूड बॉम्ब म्हणजेच देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हे बॉम्ब खिदिरपूर चौकाजवळ एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये सापडले. याबाबत माहिती मिळताच बॉम्ब स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जिथे बॉम्ब आढळले, ती जागा भाजप कार्यालयाच्या जवळच आहे. हे बॉम्ब ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिल्ट्री इंटेलिजेंसकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे कोलकाता पोलिसांच्या अँटी राउडी सेक्शनने हे बॉम्ब हस्तगत केले आहेत.

17 फेब्रुवारीला ममता बॅनर्जींच्या सरकारमधील राज्यमंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता.
17 फेब्रुवारीला ममता बॅनर्जींच्या सरकारमधील राज्यमंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता.

ममता सरकारमधील मंत्र्यावर झाला आहे बॉम्ब हल्ला
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर 17 फेब्रुवारीला ममता बॅनर्जींच्या सरकारमधील राज्यमंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्याते गंभीर जखमी झाले होते. तो हल्ला रात्री 9:45 वाजता मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वे स्टेशनजवळ झाला होता. हल्लेखोरांनी एकानंतर एक असे अनेक बॉम्ब हुसैन यांच्या दिशने फेकले होते. त्या घटनेत 22 जण जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने त्या हल्ल्याचा तपास एनआयला सोपवला होता.

निवडणुकीदरम्यान शंभरपेक्षा जास्त बॉम्ब सापडले

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरुईपूरमध्ये 40 पेक्षा जास्त देशी बॉम्ब सापडले होते. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा आणि ममता यांचे भाच्चे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या परिसरात रॅली आणि रोडशो केला होता. यापूर्वी, 26 मार्चलाही कोलकाताच्या बेनीपुकुर सीआईटी रोडवरी एका इमारतीसमोर 26 देशी बॉम्ब सापडले होते. याच्या दोन दिवसानंतर नरेंद्रपूर परिसरातून पोलिसांनी 56 बॉम्ब जप्त केले होते.

बातम्या आणखी आहेत...