आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 51% Of Patients In The Country Are In Kerala; Lockdown 2 Days A Week; News And Live Updates

कोरोना स्फोट:देशातील 51% रुग्ण केरळात; आठवड्यात 2 दिवस लॉकडाऊन; केरळात वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने पाठवले विशेष पथक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संसर्गाचे भय... देशातील 46 जिल्ह्यांत संसर्गाचा दर 10% पेक्षा जास्त, पैकी 31 ईशान्य राज्यांचे

केरळातील वाढत्या रुग्णसंख्येने देशाला पुन्हा धडकी भरवली आहे. तेथील स्थिती पाहता केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांच्या नेतृत्वात ६ तज्ज्ञांचे पथक केरळला पाठवले आहे. दीड महिन्यापूर्वी केरळात देशातील फक्त १३% नवे रुग्ण आढळत होते. आता ५१% आढळत आहेत. दुसरीकडे, देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही सर्वाधिक केरळातच आहेत. तेथे १.५० लाख सक्रिय रुग्ण असून ते देशाच्या ३८% आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले, केंद्रीय तज्ज्ञांचे पथक केरळ सरकारसोबत काम करेल. काही दिवसांपूर्वी धार्मिक सणांवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत केंद्राने केरळ सरकारला पत्रही लिहिले आहे. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केरळ सरकारने गुरुवारी नव्या निर्बंधांची घोषणा केली. त्यानुसार, आठवड्यातील २ दिवस (शनिवार व रविवार) संपूर्ण लॉकडाऊन लागू असेल.

उत्तर भारतात राजस्थानातील तीन जिल्ह्यांत संसर्गाचा दर १० टक्क्यांवर पोहोचला आहे
आगामी दिवसांत महामारीचा का प्रभाव किती हाेऊ शकतो याचा अंदाज संसर्गाचा दराने (टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट) कळतो. या हिशेबाने ईशान्येकडील राज्यांची स्थिती नाजूक आहे. भारतात संसर्गाचा सरासरी दर सध्या २% आहे. देशातील ४६ जिल्ह्यांत हा दर १०% पेक्षा जास्त आहे. यातील ३१ ईशान्येकडील राज्यांचे आहेत. सर्वाधिक नव्या रुग्णांच्या केरळातील १२ जिल्ह्यांत दर १०% पेक्षा जास्त आहे. उत्तर भारतातील फक्त तीन जिल्ह्यांत दर १०% वर आहे. त्यात राजस्थानातील सिरोही, राजसमुंद आणि चित्तोडगडचा समावेश आहे.

अचानक संसर्गवाढीचे एक कारण म्हणजे निर्बंधांत सूट
‘केरळ राज्यात संसर्ग संपूर्णपणे पसरलेला नाही. कारण तेथे मायक्रो कंटेनमेंट झोनचे अचूकपणे पालन होत आहे. आता अचानक संसर्ग वाढण्यामागील एक कारण म्हणजे उत्सवानिमित्त निर्बंध शिथिल करणे हे आहे.’ - प्रो. नरेंद्र अरोरा, चेअरमन, कोविड -१९ वर्किंग ग्रुप, एनटागी

महाराष्ट्र व ४ दाक्षिणात्य राज्यांत देशातील ७९% नवे रुग्ण
देशात रोज आढळणारे ७९.३% नवे रुग्ण फक्त ५ राज्यांमध्ये आहेत. त्यात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा समावेश आहे. याचप्रमाणे देशातील ७५% सक्रिय रुग्णही याच ५ राज्यांत आहेत. दक्षिणेनंतर संसर्गाचा जास्त धोका ईशान्येकडील राज्यांना आहे.

बातम्या आणखी आहेत...