आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 51 part Red Zone In Kashmir, Shab e Barat's Collective Prayer Will Not Happen; 15 New Patients In The State

कोरोना व्हायरस:काश्मीरमध्ये 51 भाग रेड झोन, शब-ए-बारातची सामूहिक प्रार्थना नाही; राज्यात 15 नवीन रुग्ण

श्रीनगर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
छायाचित्र श्रीनगरच्या चित्ताबलचे आहे. नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. त्याशिवाय बांदीपोरा जिल्ह्यातील दोन व काही गावांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी परिसर बफर झोन घोषित झाला. - Divya Marathi
छायाचित्र श्रीनगरच्या चित्ताबलचे आहे. नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. त्याशिवाय बांदीपोरा जिल्ह्यातील दोन व काही गावांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला. संसर्ग रोखण्यासाठी परिसर बफर झोन घोषित झाला.
  • राज्यात १५ नवीन रुग्ण, पैकी ५ परदेशातून परतले, ४ संपर्कात आल्याने बाधित, १ दिल्लीहून आला
  • १०९ तर जम्मूत ३० बाधित आढळून आले. आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणूचा वेगाने संसर्ग होत आहे. बुधवारी येथे १५ नवीन रुग्ण समोर आले. त्यापैकी ११ काश्मीर व तीन जम्मूतील आहेत. काश्मीरमधील बाधित श्रीनगर, बारामुल्ला, बांदीपोरा जिल्ह्यातील आहेत. श्रीनगरमध्ये ५ बाधित लोकांना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. ते सर्व नायजेरियातून परतलेले आहेत. बांदीपोरामध्ये ४ लोक बाधितांच्या संपर्कात आल्याने आजारी पडले. कुपवाडा येथे एक बाधित सापडला. तो दिल्लीच्या निजामुद्दीन येथून परतला आहे. त्यामुळे राज्यात एकूण बाधितांची संख्या १३९ वर गेली आहे. त्यापैकी श्रीनगर-१०९, जम्मू-३० अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शब-ए-बारातमध्ये सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी, परदेशी पर्यटकांची माहिती लपवल्यास हाऊसपोट मालकावर केस संपूर्ण राज्यात ५१ क्षेत्र रेड झोनच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यापैकी ३२ काश्मीर तर १९ जम्मूतील आहेत. जिल्हाधिकारी डॉ. शाहिद इक्बाल चौधरी यांनी ईदगाह, लाल बाजारला रेड झोन घोषित केले. श्रीनगरच्या छत्ताबल क्षेत्राला देखील सील करण्यात आले आहे.  शब-ए-बारात दरम्यान धार्मिक विधींवर बंदी लावलेली आहे. कलम १४४ लागू केले आहे. कोठेही सामूहिक प्रार्थना होऊ शकत नाही. हे आदेश ९ एप्रिलपर्यंत लागू राहतील. उल्लंघन करणाऱ्यांच्या िवरोधात कलम १८८ वव ५१ नुसार कारवाई केली जाणार आहे.  श्रीनगरमध्ये प्रशासनाने गेल्या १० दिवसांत २२ विभागांतील १ लाख घरांपर्यंत रेशन पोहोचवले आहे. एकूण ६० हजार क्विंटल तांदूळ, ३ हजार क्विंटर गहू पाठवला. त्याशिवाय ५० हजार घरांत राज्याने सिलिंडरही पोहोचवले आहेत.  परदेशी पर्यटकांबद्दल माहिती लपवणाऱ्या आरोपी हाऊसबोट मालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दल सरोवरात घाट क्रमांक नऊ जवळील हाऊसबोटमध्ये १५ मार्च रोजी ब्रिटिश पर्यटक थांबला होता. 

बातम्या आणखी आहेत...