आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्रिपदाची २३ वर्षे पूर्ण केली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ते प.बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांना मागे टाकून दीर्घकाळ सीएम पदावर राहणारे दुसरे नेते ठरतील. त्यांच्या पुढे केवळ सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग राहतील. चामलिंग २४ वर्षे १६६ दिवस मुख्यमंत्री राहिले. पटनायक यांनी पुढील निवडणूक जिंकल्यास ते सीएम झाल्यानंतर ६ महिन्यांतच चामलिंग यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येतील.
ओडिशाच्या राजकारणाचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार सांगतात की, पटनायक ५१ वर्षांपर्यंत राजकारणात नव्हते. एवढी वर्षे दिल्लीत राहणारे पटनायक अचानक राजकारणात उतरले आणि एका वर्षाच्या आत संसद तसेच केंद्रीय मंत्री झाले. अडीच वर्षांतच मुख्यमंत्री झाले आणि अद्याप अपराजित आहेत. यादरम्यान, दोन वेळा यूपीए सरकार राहिले. सध्याच्या भाजप सरकारची ही दुसरी टर्म आहे. मात्र, ओडिशात काँग्रेस आणि भाजप दोघांनाही शिरकाव करण्यात यश मिळाले नाही.
पटनायक यांचे आत्मचरित्र लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार रुबेन बॅनर्जी म्हणाले की, ओडिशात सत्ताविरोधी घटक चालत नाही. बिजदच्या सलग विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, राज्य सरकारच्या मोफत योजना. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यात व गरजूंसाठी कोणती ना कोणती मोफत योजना आहे. ज्येष्ठ पत्रकार रवी दास म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७०% महिला मतदारांनी बिजदला मतदान केले आहे.
पटनायक यांच्यानंतर नेतृत्व कोण करणार हा प्रश्न पटनायक यांचे मोठे भाऊ प्रेम पटनायक उद्योगपती असून दिल्लीत राहतात. मोठी बहीण लेखिका गीता पटनायक अमेरिकेत आहेत. अधूनमधून असे वृत्त येते की, नवीन पटनायक यांच्यानंतर पुतण्या अरुण पटनायक(प्रेम यांचे पुत्र) पक्षाचे नेतृत्व करतील. मात्र, बिजद व पटनायक त्याचे खंडन करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.