आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षाचे सुरुवातीचे ३ महिने आयटीसाठी सर्वात चांगले राहिले. यादरम्यान ५ प्रमुख क्षेत्रे (आरोग्य, परिवहन, व्यापार, वित्तीय सेवा व रेस्टॉरंट-निवास) मिळून जितक्या भरती झाल्या त्यापेक्षा दुपटीहून अधिक एकट्या आयटी/बीपीओमध्ये झाल्या.
जानेवारी-मार्च २०२२ दरम्यान या ५ क्षेत्रांमध्ये एकूण १.४८ लाख कर्मचारी वाढले. तर एकट्या आयटी/बीपीओमध्येच ३.७४ लाख कर्मचारी वाढले आहेत. तथापि, यादरम्यान शिक्षण, उत्पादन व बांधकाम क्षेत्रात कर्मचारी घटले आहेत. सर्वाधिक १.४४ लाख कर्मचारी उत्पादन क्षेत्रात, २२ हजारांपेक्षा जास्त शिक्षणात आणि जवळपास ९ हजार बांधकाम क्षेत्रात घटले आहेत. कामगार व रोजगार मंत्रालयाद्वारे मंगळवारी जारी केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्व्हेतून हे चित्र समोर आले आहे.
नियमित कर्मचारी ठेवण्यात शिक्षण, परिवहन टॉप-३ मध्येआयटी/बीपीओ क्षेत्रात नियमित कर्मचारी सर्वाधिक (९४.६९%) आहेत. या यादीत परिवहन दुसऱ्या (९१.८९%) आणि शिक्षण तिसऱ्या (९१.१४%) क्रमांकावर आहे.बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक (१९.०४%) कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करतात.
या बाबतीत उत्पादन क्षेत्र दुसऱ्या (१२.३८%) आणि आरोग्य तिसऱ्या (९.०८%) स्थानी आहे.बांधकाम क्षेत्रात रोजंदारी किंवा पार्टटाइम काम करणारे सर्वाधिक ५.६९% आहेत. उत्पादन दुसऱ्या (३.९६%) आणि वित्तीय सेवा क्षेत्र तिसऱ्या (३.६%) स्थानी आहे.सर्व नऊ क्षेत्रांत एकूण ८६.४२% कर्मचारी नियमित व ८.६६% कंत्राटी म्हणून काम करतात.
नव-शक्ती; शिक्षणात ४४% व वित्तीय सेवांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची भागीदारी ४१% झाली त्रैमासिक (जानेवारी-मार्च २०२२) रोजगार सर्व्हेनुसार, आरोग्य क्षेत्रामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा वाटा ५२%, म्हणजेच त्यांनी पुरुषांना मागे टाकले.
शिक्षणात ४४%, वित्तीय सेवांमध्ये ४१% आणि आयटी/बीपीओ क्षेत्रांत ३६% भागीदारी महिला कर्मचाऱ्यांची आहे.
एप्रिल-जून २०२१ तिमाहीत ९ प्रमुख क्षेत्रांतील एकूण कर्मचाऱ्यांत २९.३०% महिला होत्या. त्या जानेवारी-मार्च २०२२ च्या तिमाहीत ३१.७% पर्यंत पोहोचल्या.
जानेवारी-मार्च २०२२ दरम्यान आयटी/बीपीओमध्ये ३८.३१ लाख कर्मचारी झाले आहेत. तर ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ मध्ये ही संख्या ३४.५६ लाख होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.