आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे:कोरोनाचे 5,335 नवे रुग्ण; सरकार आज बैठक घेणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५ हजार ३३५ नव्या रुग्णांची नोंद झाली. हा आकडा आदल्या दिवसाच्या तुलनेत २०% जास्त आहे. हे रुग्ण १९५ दिवसांनंतर(सुमारे ६ महिन्यांनंतर) सर्वात जास्त आहेत. २४ तासांत १३ मृत्यू झाले आहेत. या रुग्णांमुळे देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजार ५८७ झाली आहे. यादरम्यान, केंद्र सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करतील. या आभासी बैठकीत आरोग्य विभाग, नीती आयोगातील अधिकारी सहभागी होतील.