आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 54 Thousand For The First Time In 28 Months; Gold Down By Rs 1,664 From Record Level

सोने चमकले:साेने 28 महिन्यांत पहिल्यांदाच 54 हजारांवर ; सोने विक्रमी पातळीपेक्षा 1,664 रुपये खाली

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेन्याची किमत बुधवारी ५४,४६० रुपये प्रति १० ग्रॅमपेक्षा वर गेले अाहे. २८ महिन्यात पहिल्यांदाच असे झाले अाहे. यापूर्वी १० अाॅगस्ट २०२० रोजी सोने ५५, ५१५ रुपये झाले होते. दुसऱ्याच दिवशी ११ ऑगस्ट रोजी ५३,९५१ रुपयावर आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच सोने ५४ हजारापेक्षा वर आले. विश्लेष्कांच्या मते, ही तेजी २०२३ मध्येही राहू शकते. खरं तर, देश आणि जगभरात महागाई कमी होत चालली आहे. त्यामुळे डॉलरमध्ये मोठी घसरण दिसून आली अाहे. अशा वेळी सोने विकत घेण्यासाठी जास्त डॉलर मोजावे लागत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या मते, बुधवारी सोने (२४ कॅरेट)ची किमत ५४,४६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. या महिन्या आतापर्यंत १,३४२ रुपये महाग झाले आहे. १ डिसेंबर रोजी सोने ५३, १२० रुपये होते. ७ ऑगस्ट २०२० रोजी ५६,१२६ रुपयाच्या विक्रमी पातळीवर होते. त्या पातळीपेक्षा फक्त १,६६४ रुपये आहे. आयबीजीए देशातील १४ प्रमुख शहरांमध्ये सोन्याची सरासरी किंमत देते.

आणखी वाढू शकतात सोन्याचे दर बाँड किंगच्या नावाने प्रसिद्ध जेफरी गुंडलाचने एका नोटमध्ये लिहिले की, ‘सोन्याने या वर्षी चांगली कामगिरी केली. गेल्या २०० दिवसात भाव ज्या पद्धतीने (१,८२१ डॉलर प्रति आऊंस)मध्ये वर-खाली येत होते, सोन्याने या आठवड्यात ते पार केले.

२०२३ मध्ये ६४,००० पर्यंत जाऊ शकते किमती केडिया एडवायझरीचे संचालक अजय केडियाने सांगितले, महागाई कमी होत चालली. २०२३ मध्ये सोने ६४,००० रुपये प्रती ग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. आयआयएफएलचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी अंदाज व्यक्त केला की, या वर्षी सोन्याची किंमत ५६ हजार रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते.

सोन्यात तेजीची मोठी कारणे १. डॉलरमध्ये मंदी : दिवाळीच्या आधी या वर्षी ऑक्टोबरमध्ये डॉलर इंडेक्स ११४ पेक्षा वर गेले होते. आता ते घसरुन १०४ वर गेले आहे. त्यामुुळे सोन्यासाठी जास्त डॉलर मोजावे लागत आहे.

२. केंद्रीय बँकांची खरेदी : २०२२ मध्ये केंद्रीय बँकांनी सुमारे ४०० टन सोने विकत घेतले. चीनने नोव्हेंबरमध्ये ३२ टन सोने विकत घेतले होते, २०१९ नंतर पहिल्यांदाच सोन्याचा साठा वाढला.

3. पुरवठ्यात कमतरता : दक्षिण आफ्रिकेच्या नेडबँकमधील अर्थशास्त्रज्ञांच्या मते, ऑक्टोबरमध्ये सोन्याचे उत्पादन १०.४% कमी झाले. सप्टेंबरमध्येही सोन्याच्या खाणकामात ५.१ % घट झाली होती.

बातम्या आणखी आहेत...