आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची दुसरी लाट ६ वर्षांखालील मुलांना बाधित करू शकली नाही. यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली - एम्सद्वारे जुळवली जात असलेली आकडेवारी आणि नुकत्याच झालेल्या सीरो सर्व्हेच्या आधारावर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहोचले की, दुसऱ्या लाटेदरम्यान निम्म्याहून अधिक मुले बाधित झाली होती. दुसरी गोष्ट- एवढ्या मोठ्या संख्येने संसर्ग होऊनही लहान मुले आजारी पडली नाहीत. त्यामुळे त्यांना लस देण्याची गरजही भासणार नाही. दिल्ली एम्स आणि पाटणा एम्समध्ये २ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी सुरू आहे. चाचणीपूर्वी अँटिबॉडी तपासल्या जातात. वास्तविक चाचणीत ज्यांना संसर्ग झालेला नाही, अशांना सहभागी केले जाते.
एम्समध्ये चाचणीपूर्वी मुलांचे स्क्रीनिंग केले गेले. यातील निष्कर्ष पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित होत आहेत. दिल्लीतील चाचणीत सर्वच मुलांमध्ये ५५% अँटिबॉडी आढळली. अँटिबॉडी संसर्गानंतरच तयार होतात. पाटणा एम्समध्येही ६०% हून अधिक मुलांत अँटिबॉडी आढळून आल्या. विशेष म्हणजे या मुलांत कधीच कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. डॉक्टरांनी मुलांच्या आई-वडिलांकडून आरोग्याबाबत माहिती घेतली असता ते सहा महिन्यांपासून आजारीच पडले नव्हते, असे कळले. हीच बाब शास्त्रज्ञांत नवी आशा निर्माण करत आहे.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉ. जुगलकिशोर म्हणाले की, "जेव्हा घरी एखाद्यास संसर्ग होतो तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य त्यातून सुटणे कठीणच असते. ५५% हून अधिक मुले बाधित झाली आणि ती कधी बरी झाली हे कुटुंबीयांनाही कळले नाही. त्यामुळे मुलांना लस द्यावी की नाही, यावर आणखी संशोधनाची गरज आहे.
एम्सच्या चाचणी आणि सिरो सर्व्हेनुसार 50%हून लोक संसर्ग होऊन बरे झाले; तथापि, सरकारी नोंदींमध्ये बाधित लोकांची संख्या केवळ 2.4%
दुसऱ्या लाटेदरम्यान डब्ल्यूएचओच्या मदतीने एम्स दिल्ली, गोरखपूर, अागरतळा, भुुवनेश्वर आणि पुद्दुचेरीत मार्चमध्ये सिरो सर्व्हे झाले. एका सेंटरवर २-२ हजार नमुने शहरी व ग्रामीण भागातून घेतले. यातून उघड झाले की, ५२.७% मुले आणि ६०% हून प्रौढांत अँटिबॉडी आढळल्या.
मुलांच्या शरीरात संक्रमणानंतर तयार अँटिबॉडी आढळल्या
या दोन शहरांत सरकारीआकड्यांनुसार बाधित 7,239 लोक (प्रति 1 लाख) 602 लोक (प्रति 1 लाख)
10-18 वर्षांपर्यंतच्या मुलांत अधिक संसर्ग
एक्स्पर्ट व्ह्यू...कोरोनाची तिसरी लाट आली तरी मुले सुरक्षित असतील
"संक्रमणाची तिसरी लाट आल्यास मुले आजारी पडतील, असे म्हणू शकणार नाही. ते सुरक्षितच असतील. कारण मुलांत लक्षणे दिसत नाहीत. लस गंभीर आजारापासून वाचवते. त्यामुळे सद्य:स्थिती पाहून वाटते की, मुलांना लसीची गरजच पडणार नाही. तथापि, लसीची चाचणी भविष्याच्या दृष्टीने गरजेची आहे. - प्रो. संजय राय, एम्स दिल्ली
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.