आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीत दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहेत. याच पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, एलजी अनिल बैजल आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची दिल्लीतील कोरोना परिस्थितीबाबत बैठक झाले. त्यानंतर मनीष सिसोदिया म्हणाले की, 31 जुलैपर्यंत दिल्लीत 81 हजार खाटांची गरज पडेल आणि रुग्णसंख्या 5.5 लाख होऊ शकते. दिल्ली सरकारचा हा अंदाज सध्या 12 ते 13 दिवसात झालेल्या दुप्पट रुग्णसंख्येच्या आधारे आहे. दिल्लीत सध्या 12.6 चा डबलिंग रेट आहे.
दिल्ली सरकारचा अंदाज आहे की, 15 जूनपर्यंत दिल्लीत 44 हजार रुग्ण होतील आणि 6, 600 बेडची गरज पडेल. तर, 30 जूनपर्यंत दिल्लीत 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण होती आणि 15,000 खाटांची गरज पडेल. तसेच, 15 जुलैपर्यंत 2.25 लाख आणि 31 जुलैपर्यंत 5.5 लाख रुग्ण होऊन, 81,000 बेडची गरज पडेल.
पुढे त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसचे कम्यूनिटी ट्रांसमिशन सुरू झाले आहे. पण केंद्राचे अधिकारी म्हणत आहेत की, अद्याप कम्यूनिटी स्प्रेड होत नाहीये. ते म्हाणाले की, दिल्लीकरांसाठी बेडची नवीन समस्या निर्माण झाली आहे. अशाच पद्धतीने संक्रमण पसरल्यास बेड कुठून आणायचे.
स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीसोबत झालेल्या बैठकीतून निघाल्यानंतर सिसोदिया म्हाले की, 'मीटिंगमध्ये चर्चा झाली आहे की, 12-13 दिवसात कोरोनाची प्रकरणे दुप्पट होत आहेत. 30 जूनपर्यंत 15 हजार खाटांची गरज पडेल आणि 30 जूनपर्यंत एका लाखापेक्षा जास्त रुग्णसंख्या असेल.'
संक्रमणाचा सोर्स मिळत नाहीये- आरोग्यमंत्री
यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीदेखील दिल्लीत कम्यूनिटी ट्रांसमिशन होत असल्याचे म्हटले होते. ते मंगळवारी म्हटले होते की, दिल्लीमध्ये कोरोनाचा कम्यूनिटी स्प्रेड होत आहे. या नवीन रुग्णांमध्ये कोरोनाचा सोर्स सापडत नाहीये.
पुढे म्हणाले होते की, epidomology मध्ये 4 स्टेज असतात. तिसरी स्टेज असते, कम्युनिटी स्प्रेड. कम्यूनिटी स्प्रेड तेव्हा म्हटले जाते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरिरात व्हायरस कसा आला, याची माहिती मिळत नाही. असे एकच नाही, तर अनेक केस येत आहेत. अंदाजे अर्ध्या केसमध्ये संक्रमण कुठून आले, याची माहिती मिळत नाहीये.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.