आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 55 Lakh Students Every Year In The Most Difficult 5 Exams, A 1.25 Crores From SSS

स्पर्धा परीक्षा:सर्वात कठीण 5 परीक्षांत दरवर्षी 55 लाख विद्याथी, इकडे एसएससीत सव्वा कोटी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूपीएससीने २०२९-२० मध्ये जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार जवळपास ३० लाख विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये सहभागी झाले. तसेच एसएससीच्या २०१८-१९ करिता जाहीर आकडेवारीनुसार एका वर्षात घेतलेल्या जवळपास ११ परीक्षांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले.

यूपीएससी-एसएससी : २० पेक्षा जास्त परीक्षा, दीड कोटीपेक्षा जास्त परीक्षार्थी
1. केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)

देशभरात झालेले सर्व्हे व तज्ज्ञांच्या नुसार तीन टप्प्यांत होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात होणारी सर्वात कठीण परीक्षा म्हटली जाते. यात जवळपास ८०० जागांसाठी दरवर्षी ३० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करतात.

2. कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट)
देशातील प्रतिष्ठित बिझनेस स्कूल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी सव्वादोन लाखांपेक्षा जास्त परीक्षार्थी अर्ज करतात. त्यांच्यासाठी अवघ्या ५ हजार जागा आहेत.

3. जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई)
प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था आयआयटीच्या १६०५३ जागांसाठी दरवर्षी जवळपास १५ लाख विद्यार्थी अर्ज करतात. सुमारे ४५ विद्यार्थ्यांपैकी एकाची या परीक्षेसाठी निवड होते.

4. ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट)
अभियांत्रिकी, तांत्रिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रात उच्च शिक्षण व इतर शासकीय शिष्यवृत्तीसाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यात दरवर्षी जवळपास ७ लाख अर्ज येतात, त्यात अवघ्या १७.८ टक्क्यांना यश मिळते.

5. कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (क्लॅट)
कायद्याच्या शिक्षणासाठी २३ राष्ट्रीय कायदा विद्यापीठासह काही संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. २५०० जागांसाठी २०२० मध्ये ७५ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले होते.

यूपीएससी, कॅट, जेईई, गेट व क्लॅट देशातील ५ सर्वात कठीण परीक्षा म्हटल्या जातात. दरवर्षी सुमारे ५५ लाखांपेक्षा जास्त परीक्षार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होतात.

फक्त यूपीएससीबद्दल बोलायचे तर यात जवळपास ८०० जागांसाठी ३० लाख विद्यार्थी दरवर्षी अर्ज करतात. त्यात अवघे ०.०२६% परीक्षार्थी यशस्वी हाेतात.

बातम्या आणखी आहेत...