आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा४० दिवसांच्या टाळेबंदीनंतर सोमवारी देशातील दुकाने व कार्यालये उघडली. सवलती वाढलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी एकूण ७३६ जिल्ह्यांपैकी ६०० जिल्ह्यांत दुकाने सुरू झाली. मात्र सर्वाधिक गर्दी झाली दारूच्या दुकानांसमोर. काही शहरांत तर दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. बहुतांश शहरांत दारूच्या दुकानांपुढे फिजिकल डिस्टन्सिंग लागू करण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. सोमवारी उत्तर प्रदेशात २२५ कोटी, महाराष्ट्रात २०० कोटी, राजस्थानात ५९ कोटी, कर्नाटकात ४५ कोटी आणि छत्तीसगडमध्ये २५ कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली.
दिल्लीत दारूवर ७०% कोरोना शुल्क
दिल्ली सरकारने सोमवारी रात्री दारूवर विशेष कोरोना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तेथे एमआरपीवर ७०% वाढीव पैसे द्यावे लागतील. नवीन नियम मंगळवारी सकाळपासून लागू होईल. हे पैसे कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांवर वापरले जातील.
रस्त्यांवर वाहतूक वाढली : खासगी व सरकारी कार्यालये सुरू झाल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक वाढली. ओला व उबरनेही ग्रीन-आॅरेंज झोनमधील शहरांत सेवा बहाल केली. तथापि, या वाहनांत एसी सुरू ठेवता येणार नाही. तसेच फक्त दोनच प्रवाशांना बसवता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.