आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rain Update Maharashtra | Mansoon Update | 56% Less Rainfall In 18 States As Monsoon Returns; Total Rainfall Decreased By 1%

मान्सून परतीच्या मार्गानजीक:18 राज्यांत 56% कमी पाऊस; एकूण पाऊस 1% कमी; राज्यात 14 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत तीन महिन्यांत देशभरामध्ये नियमितपेक्षा ५ टक्के अधिक पाऊस पडला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत देशभरात हा आकडा जवळपास ६ टक्के असा हाेता. मात्र, गत दहा दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये कमी- अधिक पाऊस पडत आहे. याच कारणामुळे या आकडेवारीत चढ-उतार झालेला दिसत आहे.

पश्चिम बंगालमधील काही भागात, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, चंदीगड आिण उत्तराखंडसारख्या १८ राज्यांमध्ये आतापर्यंत ५६ टक्के पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये नियमित काेट्यापेक्षा निम्म्या प्रमाणात पाऊस पडल्याची नाेंद झाली. यापेक्षाही बिहार आणि झारखंडमध्ये विदारक परिस्थिती आहे. या ठिकाणी आतापर्यंत फक्त अनुक्रमे ३६ % आणि २७ % पाऊस पडला आहे. त्यामुळे हा आकडा चिंताजनक मानला जात आहे. कारण आता यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास जवळ आला आहे. येत्या १७ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू हाेणार आहे. यामुळे १५ ऑक्टाेबरपर्यंत मान्सून पूर्णपणे परतला जाईल. मात्र, याच दरम्यान गत दाेन वर्षांप्रमाणेच ‘ला नीना’चे सावट आहे. हा धाेका यंदाही निर्माण हाेऊ शकताे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय आता आगामी चार दिवसांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सप्टेंबर महिन्यात १०९ टक्के पावसाची शक्यता विभागाने वर्तवली आहे. या महिन्यात साधारणपणे १६७.९ मिमी पाऊस पडत असताे. दुसरीकडे १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात साधारण पाऊस पडताे. यामध्ये महाराष्ट्रासह गाेवा-काेकण, गुजरात, छत्तीसगड, आेडिशा, तेलंगणाचा समावेश आहे.

कोकणाला झोडपले

राज्यात शनिवारी कोकणात सर्वत्र जोरदार, तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह हलका ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात १४ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...