कोरोना देशात / संक्रमणाच्या 623 केस आणि 12 मृत्यू, देशातील 25 राज्यांमध्ये पोहोचले कोरोनाचे संक्रमण

  • ओडिशा सरकार डॉक्टर, रुग्णालय कर्मचाऱ्यांना आताच देणार 4 महिन्यांचे एडव्हांस वेतन; सीएम पटनायक यांची घोषणा

दिव्य मराठी

Mar 25,2020 09:43:31 PM IST

नवी दिल्ली - देशातील राज्य सरकारांनी प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, संक्रमितांची संख्या बुधवारी 623 झाली आहे. आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु केंद्र सरकारने आतापर्यंत देशात 562 पॉझिटिव्ह आणि 512 ऍक्टिव्ह केस असल्याची माहिती दिली आहे. आज संक्रमणाची 87 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ईशान्येत मिझोरममध्ये एक नवीन केस समोर आली. येथे नेदरलँडवरून आलेला एक पादरी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यासोबतच कोरोना संक्रमण देशातील 25 राज्यांमध्ये पोहोचले आहे. या व्यतिरिक्त तामिळनाडूच्या मदुराईमध्ये सकाळी 54 वर्षीय संक्रमित रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सर्वात जास्त 116 केस महाराष्ट्रमध्ये असून केरळ 109 संख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ओडिशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचे अॅडव्हांस वेतन

कोरिनाविरोधी युद्धात सैनिकांप्रमाणे लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससह रुग्णालय स्टाफला चार महिन्यांचे अॅडव्हांस वेतन देण्याची घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचे तोंडभर कौतुक केले. तसेच व्हिडिओ संदेश जारी करताना, या सर्वांना एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्याचे वेतन आताच देण्याची घोषणा केली.

मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसचा पहिला मृत्यू

मध्य प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची बुधवारी नोंद झाली आहे. यासोबतच, देशात कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 12 झाली आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी यासंदर्भात औपचारिक माहिती जारी केली आहे.

अपडेट्स:

  • मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी कोरोनाव्हायरस संक्रमणाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. रविवारी प्रोफेसर कॉलनीत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह मुलीच्या वडिलांनाही संक्रमण झाल्याची पुष्टी झाली आहे. मुलीचे वडील पत्रकार असून ते 20 मार्चला माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते.
  • महान एअरलाईन्सचे विमान इराणच्या तेहरान शहरातून 277 भारतीयांना घेऊन जोधपूर विमानतळावर पोहोचले.
  • तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी जनतेला लॉकडाउनचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत यासाठी सेना बोलावण्यात आली होती, आपल्याकडेही परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि नियम तोडताना कोणी दिसल्यास गोळी मारण्याचे आदेश द्यावे लागू शकतात. लॉकडाऊन आणि कर्फ्यू लागू करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. गृहमंत्रालयानुसार लॉकडाऊन तोडणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
दिल्लीमध्ये काही ठिकाणी लोक किराणा दुकानात सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहेत.
दिल्लीमध्ये काही ठिकाणी लोक किराणा दुकानात सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहेत.
  • मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये 6 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील 5 लोक इंदूरचे आणि एक उज्जैनचा रहिवासी आहे.
  • गुजरातमध्ये पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात ऍडमिशन दिले जाईल.
  • गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर 24 तास काम करणारे कंट्रोल रम बनवण्याचे आदेश दिले.
  • उत्तराखंमध्ये सर्व अत्यावश्यक सामानाची दुकाने सकाळी 7 ते 10 या वेळेतच उघडी राहतील. 10 नंतर लॉकडाऊनचे नियम कडक पाळण्यात येतील.
X