आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम नेपाळमध्ये 6.6-रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी भारताच्या अरुणाचलमध्ये 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये 48 तासांत कमी तीव्रतेच्या भूकंपाचे तीन पेक्षा जास्त धक्के बसले. आता भूकंपासंदर्भात आयआयटी कानपूरच्या संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे.
त्यानुसार भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये 7.8 ते 8.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. 1803 मध्ये असा भूकंप झाला होता. हिमालय पर्वतरांगातील टेक्टोनिक प्लेट्सच्या अस्थिरतेमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
भूकंपप्रवण क्षेत्र चार भूकंपीय क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहेत
भारतात मोठे भूकंप होऊ शकत नाहीत, हा विचार चुकीचा
आयआयटीमधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्रा. जावेद एन मलिक यांची टीम दीर्घकाळापासून भूकंपांवर संशोधन करत आहे. मलिक म्हणतात, 'टेक्टॉनिक प्लेट्सच्या अस्थिरतेमुळे भूकंपाचा हा प्रकार बराच काळ चालू राहील.' भारतात मोठे भूकंप होऊ शकत नाहीत, असा विचार करणे चुकीचे आहे, असे मलिक म्हणाले.
भारताचा भूकंपीय क्षेत्र नकाशा
प्रा. मलिक यांनी भूकंपाच्या संदर्भात तीन मुद्यांचे महत्त्व स्पष्ट केले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.