आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • 59 Apps Ban In Indian Army | Indian Army Has Asked Its Personnel To Delete 89 Apps From Their Smartphones Including Facebook And Instagram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्यातही 89 अ‍ॅप्सवर बंदी:लष्कराला माहिती लीक होण्याची भीती, सैनिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारखे अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोशल मीडिया अ‍ॅप्सशिवाय डेटिंग अ‍ॅप्स आणि न्यूज अ‍ॅप्स डिलीट करण्याच्या सूचनाही दिल्या

संरक्षण मंत्रालयाने लष्करातील 13 लाख जवान आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनमधून डेली न्यूज हंट न्यूज अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, झूम, पब्जीसह 89 अ‍ॅप्स 15 जुलैपर्यंत डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, या अ‍ॅप्समुळे देशातील संवेदनशील माहिती लीक होत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानत लष्कराने म्हटले आहे की, जे या आदेशांचे पालन करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. या 89 अ‍ॅप्समध्ये 59 चिनी अ‍ॅपचाही समावेश आहे. ज्यांच्यावर नुकतीच सरकारने बंदी घातली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्करातील जवानांना आॅनलाइन टार्गेट करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मीडियावर लष्करी कर्मचाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याच्या घटना उघडकीस आल्या. लष्कराचा दावा आहे की, अ‍ॅपद्वारे माहिती मिळवून पाकिस्तान व चीनसारखे देश सीमा व नियंत्रण रेषेवर अडचणी निर्माण करत आहेत. लष्कराने नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर टाळण्याचा सल्ला दिला होता. संवेदनशील पदांवरील अधिकाऱ्यांना फेसबुक अकाउंट डिलीट करण्याची सूचनाही यापूर्वी करण्यात आली होती.

सैन्याने या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे

 • मेसेजिंग प्लॅटफॉर्म : फेसबुक, बाइडू, इन्स्टाग्राम, अ‍ॅलो, स्नॅपचॅट, वीचॅट, क्यू क्यू, किक, आऊ वो, निम्बूज, हॅलो, क्यू जोन, शेअर चॅट, वाइबर, लाइन, आयएमओ, स्नो, टू-टॉक, हाइक
 • व्हिडिओ होस्टिंग : टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली, कंटेन्ट शेअरिंग, शेअर इट, झेंडर, झाप्या
 • वेब ब्राउझर : यूसी ब्राउझर, यूसी ब्राउझर मिनी
 • व्हिडियो अँड लाइव्ह स्ट्रीमिंग : लाइव्ह मी, बिंगो लाइव्ह, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाइव्ह, विगो व्हिडियो
 • यूटिलिटी अ‍ॅप्स : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर
 • गेमिंग अ‍ॅप्स : पबजी, नोनो लाइव्ह, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेन्सेंट गेमिंग अ‍ॅप्स, मोबाइल लीजेंड्स
 • ई कॉमर्स : कल्ब फॅक्टरी, अली एक्सप्रेस, चाइना ब्रांड्स, गिअर बेस्ट, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टाइनी डील, डीएचएच गेट, लाइटेन द बॉक्स, डीएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, टीबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी
 • डेटिंग अ‍ॅप्स : टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आइल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एजार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग  
 • अ‍ॅंटी व्हायरस : 360 सिक्युरिटी
 • न्यूज, ऑनलाइन बुक रीडिंग अ‍ॅप्स : न्यूज डॉग, डेली हंट, प्रतिलिपि, व्होकल
 • लाइफस्टाइल अ‍ॅप : पॉपएक्सो
 • हेल्थ अ‍ॅप्स : हील ऑफ वाय
 • म्यूजिक अ‍ॅप्स : हंगामा, साँग्स.पीके
 • ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग : येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स

भारत सरकारने 29 जून रोजी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली

सरकारने 29 जून रोजी 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यामध्ये टिक टॉक, यूसी ब्राउझर, हॅलो आणि शेअर इट यांसारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. सरकारने सांगितले होते की, या चिनी अॅप्सचे सर्व्हर भारताबाहेर आहेत. यांद्वारे युझर्सच्या डेटाची चोरी केली जात होती. या अ‍ॅप्समुळे देशाची सुरक्षा आणि एकतेला देखील धोका होता. 

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser