आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 चा दुसरा अहवाल:59% महिलांना बाजार, रुग्णालय आणि गावात एकटे जाण्यास परवानगी नाही

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य; मद्य पिणारे ७% आणि तंबाखू खाणारे ६% पर्यंत घटले
नवी दिल्ली - देशात मद्य आणि तंबाखूचे सेवन करणारे घटत आहेत. २०१५-१६ मध्ये २९% लोक मद्य पीत होते व ४५% लोक तंबाखू खात होते. २०१९-२१ मध्ये मद्य पिणारे २२% व तंबाखूचे सेवन करणारे ३९% वर आले आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी-५(एनएफएचएस-५) च्या ताज्या अहवालात ही माहिती समोर आली. तंबाखूचे सेवन करणाऱ्या महिलांची संख्याही ३%(७% ते ४% )घटली.सुखद बाब म्हणजे, महिला आणि पुरुष दोघांच्याही रोज फ्राइड फूड खाण्याच्या सवयीत घट झाली आहे.मात्र, ४ वर्षांत स्लिम महिलांचा आकडा २३% वरून १९% आला आहे.

आरोग्य विमा घेणाऱ्यांत राजस्थान देशात नंबर-१, यूपी-बिहार मागे
राज्य विमित
राजस्थान 88%
छत्तीसगड 71%
झारखंड 50%
गुजरात 44%
मध्य प्रदेश 38%
राज्य विमित
हरियाणा 26%
पंजाब 25%
महाराष्ट्र 22%
बिहार 17%
यूपी 16%

-राजस्थानच्या ८८% कुटुंबांमध्ये कमीत कमी एका व्यक्तीस विमा कवच. देशात हा आकडा फक्त ४१%. -३६ राज्यांच्या यादीत यूपी(१६%) ३४ व्या स्थानी. बिहारही १७% सोबत मागे आहे. -अंदमान-निकोबार १.८% सह ३६ व्या आणि जम्मू- काश्मीर १४% सह यादीत ३५ व्या क्रमांकावर आहे.

कुटुंब; दोनच मुली असलेल्या ६५% मातांना नकोय मुलगा
आज मुली अनेक क्षेत्रांत मुलांपेक्षा पुढे असल्या तरी कुटुंबात एक मुलगा असावा ही इच्छा कायमच आहे. एनएफएचएस-५ च्या नवीन सर्वेक्षणानुसार, फक्त दोन मुली असलेल्या ६५% महिलांना मुलगा असावा अशी इच्छा नाही, पण ३५% ची तशी इच्छा आहे. फक्त दोन मुले असलेल्या ९१% मातांना मुलीची इच्छा नाही. पुरुषांबाबतही असाच आकडा आहे. १५ ते ४९ वर्षांच्या ७०% विवाहित महिलांना आणखी मुले नकोत. २०१५-१६ मध्ये हा आकडा ६८%च होता. दुसरीकडे, महिलांना आता लहान कुटुंब हवे आहे. २०१५-१६ मध्ये जी सरासरी २.२ होती, ती घसरून आता २.१ वर आली आहे.

कुटुंब नियोजन १०% वाढले, पण ३८% महिलाच घेताहेत जबाबदारी
आज मुली अनेक क्षेत्रांत मुलांपेक्षा पुढे असल्या तरी कुटुंबात एक मुलगा असावा ही इच्छा कायमच आहे. एनएफएचएस-५ च्या नवीन सर्वेक्षणानुसार, फक्त दोन मुली असलेल्या ६५% महिलांना मुलगा असावा अशी इच्छा नाही, पण ३५% ची तशी इच्छा आहे. फक्त दोन मुले असलेल्या ९१% मातांना मुलीची इच्छा नाही. पुरुषांबाबतही असाच आकडा आहे. १५ ते ४९ वर्षांच्या ७०% विवाहित महिलांना आणखी मुले नकोत. २०१५-१६ मध्ये हा आकडा ६८%च होता. दुसरीकडे, महिलांना आता लहान कुटुंब हवे आहे. २०१५-१६ मध्ये जी सरासरी २.२ होती, ती घसरून आता २.१ वर आली आहे.

कुटुंब नियोजन १०% वाढले, पण ३८% महिलाच घेताहेत जबाबदारी -१५-४९ वर्षांच्या ७६% महिला कुटुंब नियोजनासाठी इच्छुक आहेत, २०१५-१६ मध्ये ही संख्या ६६% होती. -३८% महिला नसबंदीद्वारे कुटुंब नियोजन करतात. ५% गर्भनिरोधक गोळ्यांवर अवलंबून आहेत -बिहार (३१%), यूपी (२४%), झारखंड (२३%)च्या महिलांची मुलींच्या तुलनेत मुलांची इच्छा जास्त.

कौटुंबिक छळ; ७९% महिला पतीचा अत्याचार सहन करतात
महिलांचे वय वाढत जाते तसा त्यांचा कौटुंबिक छळही वाढतो. १८ ते १९ वर्षांच्या १७% महिला तर ४०-४९ वर्षांच्या ३२% महिला कौटुंबिक छळाच्या बळी आहेत. एनएफएचएस-५ च्या अहवालानुसार, ७९.४% महिला आपल्या पतीने केलेल्या छळाची तक्रार कधीही करत नाहीत. लैंगिक छळाच्या प्रकरणात तर ९९.५% महिला गप्प असतात. ज्यांचे पती नेहमी दारू पितात, अशा ७०% महिलांनी त्यांनी केलेला छळ गुपचूप सहन केला आहे. २३% महिला अशाही आहेत ज्यांचे पती दारू पीत नाहीत, तरीही त्या छळाच्या बळी ठरतात. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांत कौटुंबिक छळाचे प्रमाण जास्त आहे.

लैंगिक छळाच्या बळी ९९.५% महिला कधी तक्रार करत नाहीत
राज्य पीडित
बिहार 43%
यूपी 39%
झारखंड 34%
मध्य प्रदेश 31%
महाराष्ट्र 28%
राज्य पीडित
राजस्थान 27%
हरियाणा 21%
छत्तीसगड 21%
गुजरात 17%
पंजाब 13%

-कर्नाटकात सर्वाधिक ४८% महिला पतीच्या छळाच्या बळी आहेत. देशाची सरासरी ३२% आहे. -लक्षद्वीप (२.१%) आणि गोव्यात (१०%) सर्वात कमी महिलांना पतीचा छळ सहन करावा लागतो. -नोकरी करणाऱ्या ३७% महिलांना छळ सहन करावा लागतो, तर नोकरी नसणाऱ्या २६% आहेत.

बातम्या आणखी आहेत...