आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हे:59.2% मुले स्मार्टफोनचा वापर चॅटिंगसाठी करतात, फक्त 10% ऑनलाइन शिक्षणासाठी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले सोशल मीडियात सक्रिय

लॉकडाऊन आणि ऑनलाइन क्लासेसदरम्यान शाळकरी मुलांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. यात स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापराबाबत निष्कर्ष काढण्यात आले. त्यानुसार ५९.२% मुले मेसेजिंग अॅपद्वारे चॅटिंगसाठी स्मार्टफोनचा वापर करतात. फक्त १०.१% मुले ऑनलाइन शिक्षणासाठी. सर्व्हेत ३४०० विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. त्यात ४२.९%नी साेशल नेटवर्किंग अकाउंट असल्याचे मान्य केले. हे सर्वेक्षण राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने करण्यात आले. यात दिसले की, मुलांना सहज सोशल मीडियावर अकाउंट बनवता येते. फेसबुकवर १० वर्षे वयोगटातील मुलांचे तर इन्स्टाग्रामवर २४.३% मुलांचे अकाउंट आहे. हे विविध सोशल मीडिया नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या दिशानिर्देशांविरोधात आहे. या प्लॅटफॉर्मवर अकाउंटसाठी वयोमर्यादा १३ वर्षे आहे. सर्व्हेत ५८११ स्पर्धकांचा समावेश करण्यात आला. यात ३४९१ विद्यार्थी, १५३४ आई-वडील आणि ६० शाळांच्या ७८६ शिक्षकांचा समावेश होता. दिल्लीसह ६ राज्यातील हैदराबाद, मुंबई, भुवनेश्वर, रांची, गुवाहाटी इत्यादी शहरांचा यात समावेश होता.

उत्तर देणाऱ्यांमध्ये ५०% मुले, तर ४९% मुली
सर्व्हेत मुलांना विचारण्यात आले की, स्मार्टफोन/इंटरनेट डिव्हाइसेसवर कोणत्या सुविधेचा वापर करणे आवडते? उत्तरात ५२% मुलांनी चॅटिंग म्हणून उत्तर दिले. मेसेजिंग अॅपचा उपयोग करत असल्याचे सांगितले. उत्तर देणाऱ्यांमध्ये ५०.९% मुले तर ४९.१% मुली होत्या.

बातम्या आणखी आहेत...