आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 जीच्या दरात 5 जीचा आनंद:8 शहरांत 5 जी सेवा सुरू... पुढील वर्षापासून देशभरात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात 5 जी सेवेच्या प्रारंभासह डेटा क्रांतीचा नवा टप्पा सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीच्या प्रगती मैदानात इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बटण दाबून 5 जी सेवा सुरू केली. सर्वात आधी एअरटेलने ८ शहरांत (दिल्ली, मुंबई, चेन्नई, वाराणसी, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता) ती सुरू केली. मोदी म्हणाले, ‘5 जी संधींच्या अनंत आकाशाची सुरुवात आहे.’ डिसेंबर २०२३ पर्यंत देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात 5 जी सेवा पोहोचेल, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिली. दुसरीकडे, मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5 जी सेवा पोहोचवण्याची एअरटेलची योजना आहे. एअरटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या 5 जीच्या सेवा 4 जीच्या दरात मिळतील. नंतर दर वाढवले जाऊ शकतात.

4जी 5जी; वेग ३० पट अन् कव्हरेज २५० पट जास्त {जिओच्या 4 जीचा डाऊनलोड स्पीड मार्च २०२२ मध्ये २१.१ एमबीपीएस/सेकंद होता, तो सर्वाधिक होता. ७० देशांत 5 जीचा वेग आहे 700 एमबीपीएस. दक्षिण कोरियात सर्वाधिक १ जीबीपीएसपर्यंत आहे. {4 जीमध्ये प्रति चौ. किमी ४००० डिव्हाइस जोडले जातात. 5 जीमध्ये १० लाखांपर्यंत. {4 जीत लेटेन्सी ५० मिलिसेकंद, 5 जीमध्ये ती १ मिलिसेकंद. म्हणजे मोबाइल आणि नेटवर्कमधील ताळमेळ ४ पट वेगाने. {२जीबीची मूव्ही २० सेकंदांत डाऊनलोड.

बातम्या आणखी आहेत...