आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड:5 वीत शिकणाऱ्या मुलीवर 5 नराधमांनी केला सामूहीक बलात्कार; पीडितेच्या भावाने केला आरोपींचे हात-पाय कापण्याचा प्रयत्न

गुमला2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुमलामध्ये शनिवारी रात्री घडली घटना, सोमवारी तीन आणि मंगळवारी दोन आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  • 3 तास बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला जंगलात सोडले, रात्रभर जंगलात भटकल्यानंतर सकाळी पोहचली घरी

5वीत शिकणाऱ्या मुलीवर 5 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील गुमलामध्ये घडली आहे. आरोपी मुलीला घरातून उचलून जंगलात घेऊन गेले होते. घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा पीडितेच्या भावाकडून आरोपीचे हात-पाय तोडण्याचा प्रयत्न झाला. यानंतर आरोपींना हॉस्पीटलमध्ये भरती केल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

म्युजिक बॉक्स परत देण्याच्या बहाण्याने पीडितेला जंगलात घेऊन गेले

14 वर्षीय पीडितेने सांगितले की, पाचही आरोपी मित्र आहे. ती त्या सर्वांना ओळखते. पीडिताने या पाच पैकी एका आरोपीकडून गाणे ऐकण्यासाठी म्यूजिक बॉक्स घेतला होता. त्यानंतर तिने तो बॉक्स दुसऱ्या आरोपीकडे दिला. शनिवारी आरोपी तिच्या घरी आला आणि म्युजिक बॉक्स देण्यास सांगितले, पीडिताने सांगितले की, तिने म्युजिक बॉक्स दुसऱ्या आरोपीकडे दिला आहे. यानंतर आरोपी पीडितेला घेऊन मित्राच्या घरी गेला. तिथे इतर चार आरोपी आधीच येऊन बसले होते. त्यानंतर त्यांनी पीडितेला जंगलात नेले आणि रात्री आळीपाळीने बलात्कार केला. रात्रभर जंगलात भटकल्यानंतर पीडिता सकाळी आपल्या घरी आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला.

या घटनेनंतर गावात पंचायत झाली, ज्यात आरोपींनी पीडितेच्या कुटुंबावर तक्रार दाखल न करण्यास दबाव टाकण्यात आला. तसेच, पीडितेला जीवे मारुन घराला आग लावण्याची धमकीही देण्यात आली. दोन आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या भावाला मारहाणही केली.

हल्ल्यात जखमी भाऊ आणि दोन आरोपी सदर हॉस्पीटलमध्ये भरती

चॅनपुरचे एसडीपीओ कुलदीप कुमार यांनी सांगितले की, घरात घुसून पीडितेच्या भावाला मारहाण झाल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यानंतर पीडितेचा भाऊ धारदार हत्यार घेऊन आरोपींच्या शोधात गेला आणि दोन आरोपींवर हल्ला केला आणि हात-पाय कापण्याचा प्रयत्न केला. यानंतर घडलेल्या सगळा प्रकार स्थानिकांनी पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी सोमवारी दोन आणि मंगळवारी सकाळी तीन आरोपींना अटक केले. सध्या पीडितेचा भाऊ आणि दोन आरोपींना उपचारासाठी सदर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...