आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम सीमेवरून अक्षय वाजपेयी
तापमान ५० अंश सेल्सियस. उष्णतेने मोबाइलही बंद पडत आहे राजस्थानच्यास. जैसलमेरपासून २७० किमीवरील पाक सीमेवर बीएसएफच्या जवानांसोबत तप्त वाळूवर भास्कर रिपोर्टरने चोवीस तास घालवले. प्रचंड उष्ण वाऱ्यांमुळे वाळूवर उमटणारे मार्ग काही क्षणात बदलून जात होते. तहान देखील आटून जावी अशी स्थिती. शरीर आतून जणू शुष्क होत असावे. म्हणूनच पाणी पीत राहावे लागते. ओपन जिप्सीने सैनिकांना छावणीतून सीमेवर सोडले जाते. त्यानंतर त्यांची गस्तीची सहा तासांची तैनाती सुरू होते.
सहा तासांत सहा लिटर पाणी पीत राहावे लागते, लिंबू-ग्लुकोजमुळे काहीसा दिलासा १२ किलो वजन महिलाही वाहून नेतात सहा तासांत सहा लिटर पाणी प्यावे लागते. दोन लिटरमध्ये लिंबू व ग्लुकोज असते. संपूर्ण तैनातीमध्ये १० ते १२ किलोचे वजन शरीरावर असते. सहा लिटर पाणी आणि ४ रायफलशिवाय दुर्बीण तसेच इतर सामग्रीचेही वजन असते. महिलांनाही एवढेच वजन वाहून न्यावे लागते.
आयसोलेशनसारखी ड्यूटी, मनावर परिणाम
सेकंड इन कमांड अनुप कुमार म्हणाले, सीमेवरील दीर्घ ड्यूटीचा परिणाम मानसिकतेवरही होतो. ही आयसोलेशनसारखी ड्यूटी असते. दिवसभर प्रचंड उष्णता आणि रात्री सौम्य स्वरूपाची थंडी असते. वातावरणातील या बदलानुसार स्वत:ला सांभाळावे लागते.
जवानांना दोन तासांची झोप
बीएसएफच्या एका जवानाला दिवसभरात दोन शिफ्ट कराव्या लागतात. सकाळी सहा वाजता एखादा सैनिक गेल्यास त्याची ड्यूटी दुपारी १२ वाजता संपते. त्यानंतर त्यास दुपारचे जेवण वगैरे आटोपावे लागते. कारण सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या शिफ्टला जावे लागते. त्यामुळे पाच वाजेपर्यंत उठावे लागते. मग रात्री १२ वाजता सुटी होते. साडेबारा वाजता परतावे लागते. त्यानंतर दोन वाजेपर्यंत झोप मिळते. सकाळी पाच वाजता पुन्हा उठावे लागते. दोन शिफ्टमध्ये झोपही सोपी नसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.