आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिक्चर अभी बाकी है:जेडीयूच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, बिहारबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात नितीश कुमार

पटना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी नितीश कुमारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून मिळाले संकेत

अरुणाचल प्रदेशातील जनता दल यूनाइटेड (JDU) च्या 6 आमदारांनी भारतीय जनता पार्टी (BJP)मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता बिहारच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हावभावावरुन याचे संकेत मिळाले. कारण, शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांचा हावभाव असा दिसत होता, जसे ते म्हणत आहेत, 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.'

माध्यमांना प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले की, ज्यांना जायचे होते, ते गेल. आमची बैठक सुरू आहे. असा अंदाज लावला जात आहे की, येत्या काही दिवसात नितीश कुमार मोठा निर्णय घेतील. नितीश यांच्या या प्रतिक्रियेला बिहारच्या राजकारणात येणाऱ्या भूकंपाचे संकेत म्हटले जात आहे.

2 वर्षात BJP ने JDU ला अनेक धक्के दिले

नितीश कुमारांच्या JDU ने अरुणाचल प्रदेशात 7 विधानसभा जागा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण, भाजपने त्यांच्या सहा आमदारांना आपल्याकडे घेऊन नितीश यांना धक्का दिला आहे. भाजपने आतापर्यंत तीनवेळा जेडीयूला धक्का दिला आहे. यापूर्वी 2019 पासून 2020 पर्यंत केंद्र, बिहार आणि आता अरुणाचल प्रदेशात JDU ला धक्के बसले आहेत.

बातम्या आणखी आहेत...