आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारूचे सेवन:बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू, तर एकाची प्रकृती चिंताजनक

नालंदा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारूचे सेवन केल्यानंतरच प्रकृती खराब होऊन मृत्यू झाल्याचे मृतांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. मृतांमध्ये भागो मिस्त्री (वय 55), मन्ना मिस्त्री (वय 55), सुनील कुमार (वय 24), धर्मेंद्र उर्फ नागेश्वर ( वय 50) आणि कालीचरण (वय 50) याचे समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मात्र सध्या विषारी दारूमुळेच मृत्यू झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मात्र स्थानिकांचे असे म्हणणे आहे की, बाजूला गल्लीतच हातभट्टी द्वारे गावठी दारू तयार केली जाते. विषारी दारूचे सेवन केल्यानंतरच रात्री या सर्वांची प्रकृती रात्रीतून खालावली होती. त्यामुळेच त्यांचे मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

मृत भागो मिस्त्रीच्या बायको ललिता देवी यांनी सांगितले आहे की, रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर मी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले, त्यानंतर त्यांना आम्ही रुग्णालयात नेले असता असे कळाले की, त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी गावातील गावठी दारूचे सेवन केले होते. मृत मन्ना मिस्त्रीच्या मुलीने सांगितले की, माझे वडील गेल्या चार दिवसांपासून दारू पित होते. मात्र काल अचानक त्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर आम्ही त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मन्नाच्या पत्नीने आरोपींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

DM म्हणाले तीन जणांचा झाला मृत्यू

DM शंशाक शुभंकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. त्यानंतर ते म्हणाले की, सोहसराय पोलिस ठाणा हद्दीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यात एकाचा मृत्यू पॅरालिसिसने झाला असून, तर या दोघांचे दारू पिऊन मृत्यू झाले आहे. सध्या संपुर्ण जिल्ह्यात पोलिस कांबिंग ऑपरेशन करत आहेत. सोबतच प्रत्येक घराची चौकशी देखील करण्यात येत आहे. अन्य काही जण विषारी दारूमुळे आजारी पडल्याची माहिती मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...