आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी समूह-हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. जे. बी. पारदीवाला यांचे पीठ गुरुवारी म्हणाले, समितीचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. सप्रे असतील. याशिवाय समितीत ओ. पी. भट्ट, न्या. जे. पी. देवधर, बँकर के. व्ही कामत, इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी व सोमशेखर सुंदरेशन हेही आहेत. कोर्ट म्हणाले की, सेबीकडून प्रकरणाची चौकशी सुरूच राहील व २ महिन्यांत कोर्टाला अहवाल देईल. दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी ट्वीट करत म्हणाले, ‘अदानी समूह सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत करतो. सत्याचा विजय होईल.’
समितीमध्ये नंदन निलेकणी, ओ. पी. भट्ट, के. व्ही. कामतांसह सहा तज्ज्ञ १. न्या. अभय मोहन सप्रे (अध्यक्ष) : सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती. राजस्थान, छत्तीसगड, मणिपूर आणि गुवाहाटी हायकोर्टात न्यायाधीश होते. २. ओ. पी भट्ट : ५ वर्षे एसबीआयचे अध्यक्ष होते. बँक आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्षही होते. ३. न्या. जे. पी. देवधर : भारत सरकारचे वकील होते. दीर्घकाळ आयकर विभागाचे स्टँडिंग काैन्सिल होते. २००१ मध्ये बाॅम्बे हायकोर्टाचे अतिरिक्त जज बनले. सेबीत पीठासीन अधिकारी होते. ४. नंदन निलेकणी : नारायण मूर्तींसह इन्फोसिसची स्थापना केली. २००९ मध्ये यूआयडीएआयचे अध्यक्ष झाले. आधार कार्डची आयडिया दिली. सध्या जी-२० टास्क फोर्सचे सहप्रमुख झाले आहेत. ५. के. व्ही. कामत : आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष होते. इन्फोसिसचे अध्यक्ष झाले. २०२१ मध्ये सरकारने त्यांना एनएबीएफआयडीचे अध्यक्ष केले. ६. सोमाशेखर सुंदरेशन : सुरक्षा विषयाचे वकील. ते सेबीच्या अनेक समित्यांमध्ये होते. २०११ मध्ये न्या. बी. एन. श्रीकृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक क्षेत्र सुधार आयोगाचे सल्लागार होते.
लागोपाठ तिसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या सर्व १० शेअर्समध्ये तेजी अदानी समूहाच्या सर्व १० शेअर्समध्ये गुरुवारी लागोपाठ तिसऱ्या दिवशीही २ ते ५ टक्क्यांची तेजी दिसली. अदानी एंटरप्रायझेस, पाेर्ट्समध्ये ३% पर्यंत, ट्रान्समिशन, विल्मर, पाॅवर, ग्रीन एनर्जी, टाेटल गॅस व एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये ४ ते ५ टक्के तेजी होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.