आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 Raphael's First Convoy Will Arrive By July 27, Stationed At The Military Base At Ambala

लढाऊ विमान:6 राफेलचा पहिला ताफा 27 जुलैपर्यंत मिळणार, अंबाला येथील लष्करी तळावर हाेणार तैनात

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताला एकूण 36 लढाऊ राफेल विमाने मिळणार आहेत

चीनसाेबत सुरू असलेल्या सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेला येत्या जुलैतच राफेल लढाऊ विमाने मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ राफेल लढाऊ विमानांचा पहिला ताफा २७ जुलैपर्यंत भारतात पाेहाेचण्याची शक्यता आहे. यामुळे युद्धभूमीवर भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसाेबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दाेन आठवड्यांपासून वायुसेना हाय अलर्टवर आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी २ जून राेजी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लाेरेन्स पार्ले यांना फाेन करून राफेल विमाने पाठवण्याचा मुद्दा उपस्थित केला हाेता. त्यानंतर राफेल विमान वेळेवर पाठवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले हाेते.

यासंदर्भात वायुसेनेला विचारणा केली असता, त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. राफेल विमानांचा पहिला ताफा अंबाला येथील वायुसेनेच्या तळावर तैनात केला जाईल. भारताला एकूण ३६ लढाऊ राफेल विमाने मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...