आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनलॉक होणाऱ्या राज्यांत बाजारपेठा उघडल्याने अर्थव्यवस्था सावरू लागली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार १३ जूनला संपलेल्या आठवड्यात देशात बेरोजगारी दर ८.७% वर आली. हा ६ आठवड्यांचा नीचांक आहे. मेच्या शेवटी राष्ट्रीय बेरोजगारी दर १२% होता. त्यात ३.३% घट झाली आहे. शहरी बेरोजगारी दर १७.८८% होता. तो ८.१८% घटला आहे. ग्रामीण बेरोजगारी दर ३० मे रोजी संपलेल्या आठवड्यात १०.६३% होता. तो २.४% घटला आहे. देशात बेरोजगारी दर एप्रिल २०२० च्या लॉकडाऊन काळात २३.५२% च्या उच्चांकावर होता. जानेवारी २०२१ मध्ये अर्थव्यवस्था रुळावर येताच तो ६.५२% झाला. दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांत पुन्हा लॉकडाऊन लागला. यामुळे मेमध्ये बेरोजगारी दर १२% वर गेला होता. तज्ज्ञांनुसार, राज्यांत बाजारांतील निर्बंध जसजसे घटतील तसतसे रोजगाराची साधने उघडतील.
वेरूळ, अजिंठ्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आजपासून होणार खुली औरंगाबाद | पुरातत्त्व खात्याच्या परवानगीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेली पाच महत्त्वाची पर्यटनस्थळे बुधवारपासून खुली करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी जाहीर केली. यात जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणी यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरातत्त्व विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या वेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी किरण सोलापूरकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ही पाचही पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात.
आजपासून बिहारच्या बाजारांना जास्त सूट, राजस्थानात पर्यटनस्थळे उघडणार, मध्य प्रदेशात ५०% क्षमतेने मॉल-रेस्तराँना मुभा दिल्लीत मॉल-रेस्तराँना सूट, बंगळुरूत खासगी कार्यालयांना कर्मचारी व वेळेत सूट दिल्यानंतर इतर राज्यांतही अनलॉक सुरू आहे. बिहारमध्ये बुधवारपासून बाजार सायंकाळी ६ वाजेपर्यंत उघडे राहतील. तसेच खासगी कार्यालयेही १००% क्षमतेने सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. राजस्थानात बुधवारपासून पर्यटनस्थळे, स्मारके व संग्रहालये खुली. रविवारी वीकेंड कर्फ्यू {मध्य प्रदेशात बुधवारपासून आणखी सूट. मॉल-रेस्तराँ ५०% क्षमतेने उघडणार {महाराष्ट्रात जवळपास सर्व जिल्हे अनलॉक असले तरी काही जिल्ह्यांत रुग्ण वाढल्याने पुन्हा निर्बंधांची तयारी.
शाळांना परवानगी नाही : औरंगाबाद जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास अजून परवानगी नाही. सध्या केवळ ५० टक्के शिक्षकांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत टप्पेनिहाय अनलॉकच्या प्रक्रियेनुसार मंगळवारी शहरातील उद्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठी उघडली. मर्यादित पर्यटकांना प्रवेश : शहर अनलाॅक झाल्यानंतर पर्यटनस्थळे सुरू करण्याची मागणी हाेत हाेती. आता कोरोना नियमांचे पालन करून ही स्थळे उघडतील. एका पर्यटनस्थळासाठी राेज कमाल दोन हजार लोकांनाच प्रवेशाची परवानगी असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.