आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baglore Heavy Rain Update | 600 Buildings On Drainage Route To Be Demolished In Bengaluru, Rains Break 90 year Record

ग्राउंड रिपोर्ट:बंगळुरूत पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गावरील 600 इमारती पाडणार, पावसाने 90 वर्षांचा विक्रम मोडला

विनय माधव/मनोरमा सिंह | बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये पावसाने ९० वर्षांचा विक्रम मोडला आहे. देशाची आयटी राजधानी बंगळुरूच्या रस्त्यांवर नाैका दिसताहेत. शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत आणि कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. येथे ६ दिवसांत ३० दिवसांचा पाऊस कोसळला आहे. २१५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. हवामान विभागाने आगामी ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

या पुरासाठी एकटा पाऊस जबाबदार नाही. पाणी निचरा होण्याच्या मार्गावरील ६०० अतिक्रमणे हे मोठे कारण आहे. बंगळुरू महापालिकेने पहिल्यांदाच अतिक्रमण मान्य केले आहे. बीबीएमपी आयुक्त गिरिनाथ तुषार यांनी सांगितले की, अतिक्रमणांवर कारवाई सुरू झाली आहे. ६४ ठिकाणी पाडापाडी झाली आहे. आयटी उद्योग स्थापन करणे आणि सुविधा देण्याच्या नावाखाली जिथून पाण्याचा निचरा होणे अपेक्षित होते, त्याच भागात अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी आयटी कॉरिडॉर पाण्यात बुडाले.

बंगळुरूत ९९ हवामान केंद्र, मात्र इशारा गांभिर्याने घेतला नाही :

बंगळुरू कर्नाटकचे राज्य नैसर्गिक आपत्ती निगराणी केंद्र आहे. त्यांनी ९९ स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित केले आहेत. ही भारतातील कोणत्याही शहरातील सर्वात जास्त संख्या आहे. हे केंद्र कुठे, किती पाऊस होऊ शकतो,याची तीन दिवस आधी माहिती देते. मात्र, संस्थेच्या इशाऱ्याकडे गांभिर्याने घेतले नाही.

१५०० कुटुंबांना फटका, छोट्या वस्त्यांना अडचणी : जवळपास १५०० हून अधिक कुटुंबांना फटका बसला आहे. शहरातील अनेक भागांत चार-चार फूट पाणी आहे. या भागांत जा-ये करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करत आहेत. शहराच्या ४०% भागाने सरोवराचे रूप घेतले आहे. पावसामुळे बंगळुरू आयटी कंपन्यांना कमीत कमी २२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दुरावस्थेसाठी काँग्रेस जबाबदार : सीएम मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, संपूर्ण शहराची स्थिती खराब आहे,असे चित्र तयार केले जात आहे. केवळ दोन भागांला पुराचा फटका बसला आहे. यासाठी मागील काँग्रेस सरकार जबाबदार आहे. त्यांनी सरोवर क्षेत्र, बफर झोनमध्येही बांधकामास परवानगी दिली. आता ही अतिक्रमणे काढली जातील.

नेते-बिल्डरच्या संगनमताने मुख्य मार्गांवर अतिक्रमणाची सुरुवात

बंगळुरूत ९०च्या दशकाच्या अखेरीस महादेवपुरामध्ये आयटी पार्क उभारणी सुरू झाली. मात्र, येथपर्यंत पोहोचण्यास अडचणी होत्या म्हणून कंपन्यांनी चांगल्या सुविधांची मागणी केली. सरकारने रिंग रोड तयार केला. त्यामुळे केआरपुरम, महादेवपुरा इत्यादी भागांत रिअल इस्टेटची बूम आली. म्हणूनच बंगळुरूमध्ये २००४नंतर निवडून आलेले आमदारही बहुतांश रिअल इस्टेटशी संबंधित होते. यातूनच अवैध विकासाचा मार्ग खुला झाला. हळूहळू पाण्याचा निचरा ज्या मार्गावरून होत होता तेथे निवासी वस्त्या होऊ लागल्या. दुसरीकडे मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने वाहतूक आणि पाण्याचे प्रवाह अडू लागले. यातूनच ही पुराची समस्या निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...