आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलवान 2:अरुणाचलमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनच्या 600 सैनिकांना बहाद्दर भारतीय जवानांनी पिटाळले!

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १५ जवानांना किरकोळ दुखापत, ५० चीनी सैनिक रक्तबंबाळ अवस्थेत फिरले माघारी

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सुमारे अडीच वर्षापूर्वी प्रथम घुसखोरी करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशात त्याचाच कित्ता गिरवला. भारताने त्याला सडेतोड उत्तर दिले.

तवांग क्षेत्रात यांगत्सेमध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) उभय देशांचे सैनिकामध्ये संघर्षाची ठिणगी पडली. चीनी लष्कराचे सुमारे ६०० सैनिक यांगत्सेमध्ये जमले होते. चीन सैनिक या ठिकाणी तारांचे कुंपण बांधण्याच्या हेतून आले होते. भारतीय जवानांनी त्याला विरोध करताच चीनी सैनिकांनी वायरचे कटर आणि लोखंडांच्या इतर अवजारांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यावेळी उडालेल्या चकमकीत १० ते १५ भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र चीनचे ५० सैनिक प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेतच माघारी फिरले. कमांडर पातळीवर फ्लॅग मिटिंग झाल्यानंतर उभय देशांच्या सैनिकांनी त्या भागातून माघार घेतली. दरम्यान, या मुद्यावर केंद्र सरकारने देशाला विश्वासात घ्यावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पूर्व लडाखमधील गलवानमध्ये जून २०२० मध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय जवानांनी चीनचे ४५ सैनिक यमसदनी धाडले होते. तेंव्हा भारताचे २० जवान शहीद झाले होते.

गेल्या वर्षीही पकडले गेले होते चीनी सैनिक
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनी लष्कराने (पीएलए) तवांगच्या यांगत्सेमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. यांगत्सेच्या भारतीय क्षेत्रात घुसलेल्या पेट्रोलिंग करणाऱ्या चीनी सैनिकांना पकडले होते. दोन्ही देशांच्या बैठकीनंतर भारताने चीनी सैनिकांना सोडले होते.

15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती.
15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती.

का होतो संघर्ष... अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्ये एलएसी पूर्णपणे परिभाषित नाही. अशा वेळी चीनचे सैनिक १९६२ पासून पूर्वीच्या स्थितीतील दोन्ही देशांच्या कराराचे नेहमीच उल्लंघन करतात.

चीनला भारताच्या वाढत्या ताकदीची चीड

  • भारतीय लष्कराने गेल्या काही वर्षांत अरुणाचलच्या तवांग सेक्टरमध्यें एलएसीवर आपली सैन्य शक्ती वाढवली आहे.
  • तवांगच्या अप्पर दिबांग खोऱ्यात रस्ते, पूल, बोगदे, सैन्य विमानतळ-हेलीपॅड आणि दळणवळण मजबूत केले आहे.
  • लष्करासह भारतीय वायुसेनेने पूर्वोत्तरमध्ये एलएसीच्या क्षेत्रात आपले अत्याधुनिक फायटर जेटची संख्या वाढवली आहे.

लडाखनंतर आता चीनचे लक्ष अरुणाचलवर
- सूत्रांनुसार, गेल्या काही वर्षांत चीनी लष्कराने अरुणाचलच्या अपरिभाषित भागांत सैन्याची गस्त वाढवली आहे.
- मोठ्या गस्ती दलातील चीनी सैनिक नेहमी भारतीय सैन्याशी संघर्षाचा प्रयत्न करतात. चीन चिथावणीखोर कृत्ये करतो.
- एलएसीवर दोन्ही देश बंदुकांविना गस्त घालतात. त्यामुळे चीनचे सैनिक लाकडी-लोखंडी हत्यारांचा वापर करतात.

चीनने केले २००६ च्या तवांगमधील गस्ती कराराचे उल्लंघन : भारताचे संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल ए. एस. वालिया यांनी आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये दैनिक भास्करच्या प्रतिनिधीला सांगितले की, चीनने २००६ च्या तवांगमधील गस्तीच्या कराराचे उल्लंघन केले आहे. ९ डिसेंबरच्या घटनेनंतर पूर्व लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत हाय अलर्ट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.