आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाची चौकशी करत असलेल्या ईडीने सांगितले की, तपासात ६०० कोटींची अवैध मालमत्ता सापडली आहे. यात ३५० कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे, तर २५० कोटींचे अनेक व्यवहार अज्ञातांद्वारे केले आहेत. छाप्यात १ कोटी रोख, १,९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोन्याची नाणी आणि १.५ किलोहून अधिक सोन्याचे दागिने (१.२५ कोटी) जप्त केले. दिल्लीत फ्रंेड्स कॉलनी भागातील डी-१०८८ क्रमांकाचा ४ मजली बंगला एबी एक्स्पोर्ट्च्या नावे आहे. तो तेजस्वीच्या ताब्यात आहे. ४ लाखांत खरेदी केलेल्या या बंगल्याचेे आजचे बाजारमूल्य १५० कोटी असल्याचे ईडीने सांगितले आहे.
दीर्घकाळ चौकशीचा आरोप.. पत्नी रुग्णालयात, तेजस्वींची गैरहजेरी बिहारचेे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु गर्भवती पत्नीची प्रकृती अस्वस्थ असल्याचे आणि रुग्णालयात भरती असल्याचे कारण सांगून तेजस्वी ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीने छाप्यांदरम्यान शुक्रवारी यादव कुटुंबीयांची सुमारे १२ तास चौकशी केली. त्यानंतर राजश्री रक्तदाब वाढल्याने बेशुद्ध पडल्या. दरम्यान, माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आरोप केला की, केवळ सूड उगवण्यासाठी प्रकरणात माझ्या मुली, गरोदर सुनेला १५ तास बसवून ठेवले. भाजप इतक्या खालच्या स्तराला उतरून राजकीय लढाई लढणार आहे का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.