आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम्सचे सर्व्हर हॅक:आयसीएमआरच्या साइटवर 1 दिवसात 6000 हल्ले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली एम्सचे सर्व्हर हॅक केल्यानंतर सायबर हॅकर्सनी आता आयसीएमआरची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. एनआयसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरला सायबर हॅकर्सने २४ तासांत वेबसाइटवर ६००० पेक्षा जास्तवेळा हल्ले केले. हे हल्ले हाँगकाँग येथील काळ्या यादीतील पत्त्यावरून केले होते. हे हल्ले कथित रॅनसमवेअर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झाले. आयसीएमआरच्या वेबसाइटवरील मजकूर सुरक्षित आहे. वेबसाइटच्या सुरक्षेची जबाबदारी एनआयसी डाटा सेंटरकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...