आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशात सक्रिय रुग्णसंख्येत 61% घट; केवळ केरळात वाढले सक्रिय रुग्ण

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन महिन्यांत सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांत 51% घट

देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. सप्टेंबरनंतर देशात आढळून आलेल्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. दोन महिन्यांत रुग्णसंख्येत सतत वाढ होणारे केरळ हे एकमेव राज्य आहे. उर्वरित सर्व राज्यांत नव्या रुग्णांत घट झाली आहे. ३० नोव्हेंबरला भारतात ४ लाख ४० हजार ३८७ सक्रिय रुग्ण होते. २९ जानेवारीला या संख्येत घट होऊन ती १ लाख ७१ हजार ७९३ एवढी राहिली आहे. गेल्या दोन महिन्यांत केरळमध्ये १६ टक्के रुग्ण वाढले आहेत. सर्वात जास्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात यादरम्यान सक्रिय रुग्णांत ५१.६ टक्के घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी सुमारे ६३ टक्के केरळ व महाराष्ट्रात आहेत.

केवळ अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये जगातील ५६ टक्के सक्रिय रुग्ण
सध्या तीन देशांत जगातील निम्म्याहून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. अमेरिका (३७.८), फ्रान्स (११), ब्रिटन (७.७) या देशांत जगातील ५६ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. भारत सक्रिय रुग्णांच्या श्रेणीत आघाडीच्या १५ देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. ३० जानेवारीला भारत सक्रिय रुग्णाच्या बाबत जगात १६ व्या क्रमांकावर होता. अमेरिका अजूनही ९८ लाखांहून जास्त रुग्ण असल्याने आघाडीवर आहे. गंभीर रुग्णांच्या बाबतीत भारत अजूनही दुसऱ्या स्थानी आहे. भारतात ८ हजारांहून जास्त गंभीर रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे मेक्सिकोतील मृतांची संख्या वाढते आहे. या श्रेणीत मेक्सिको तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लस बनली राजकीय आयुध : नेपाळ
नेपाळचे आरोग्यमंत्री हृदयेश त्रिपाठी शनिवारी म्हणाले, जगभरातील सर्व देशांसाठी लस हे राजकीय आयुध बनले आहे. लस घेण्यासाठी जगभरातील देश राजकीय तडजोडीचा वापर करू लागले आहेत. आपल्याला नाइलाजाने असे मार्ग चोखाळायला लागत आहेत.