आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6.12 Crore Selfies Uploaded Across The Country In The Online "Har Ghar Tiranga" Competition, Only BJP ruled States Lag Behind | Marathi News

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन "हर घर तिरंगा' स्पर्धेत देशभरातून 6.12 कोटी सेल्फी अपलोड, भाजपशासित राज्येच मागे

औरंगाबाद / महेश जोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरातील 6.21 कोटी नागरिकांनी शासनाच्या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजासोबत सेल्फी अपलोड केल्या. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतरही बरीच भाजपशासित राज्ये यात मागे पडल्याचे दिसते. सर्वाधिक सेल्फी दिल्लीतून, त्यानंतर महाराष्ट्र व गुजरातचा नंबर लागला.

यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान "हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यात आली. यासाठी ध्वजसंहितेत बदल करत घरोघरी तिरंगा लावण्यास परवानगी देण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्रालयांतर्गत हे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून "हर घर तिरंगा' संकेतस्थळावर तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

टॉप - 20 मध्ये 11 गैरभाजपशासित राज्ये
सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरातून 6 कोटी 12 लाख 27 हजार लोकांनी सेल्फी अपलोड केल्या. ही संख्या अजून वाढतच आहे. या उपक्रमात भाजपशासित राज्ये पिछाडीवर असल्याचे संकेतस्थळावरील माहितीतून लक्षात येते. टाॅप 5 राज्यांत 3 बिगर भाजपशासित आहेत. टॉप 20 मध्ये 11 बिगरभाजपशासित राज्यांचा समावेश आहे.

सेल्फी अपलोडमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी;

यूपी, एमपी, कर्नाटकातून कमी
1. दिल्ली 1 कोटी 13 लाख 83325
2. महाराष्ट्र 1 कोटी 13 लाख 70,580
3. गुजरात 1 कोटी 4,723
4. उत्तर प्रदेश 89 लाख 97,299
5. बिहार 11 लाख 15,903
6. मध्य प्रदेश 13 लाख 24,538
7. कर्नाटक 12 लाख 59,722
8. तेलंगण 9 लाख 60,709
9. राजस्थान 8 लाख 59,479
10. प.बंगाल 6 लाख 69,762
11. हरियाणा 4 लाख 27,260
12. तामिळनाडू 3 लाख 96,695
13. ओडिशा 3 लाख 14,064
14. आसाम 3 लाख 50,043
15. आंध्र प्रदेश 2 लाख 63,912
16. पंजाब 1 लाख 81,728
17. केरळ 1 लाख 68,913
18. गोवा 1 लाख 66,281
19. चंदीगड 1 लाख 39,608
20. हिमाचल 1 लाख 21,823

बातम्या आणखी आहेत...