आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. १९ जिल्ह्यांमधील ८९ जागांसाठी ६२.९२ टक्के मतदान झाले. सन २०१७ च्या तुलनेत (६८.३८%) ५.४६ % कमी असून गेल्या दहा वर्षांतीलही सर्वात कमी मतदान ठरले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सन २०१२ मध्ये सुमारे ४ टक्के मतदान कमी झाल्याने या प्रांतात भाजपला १५ जागांचा फटका बसला होता. या विभागात पाटीदार, ओबीसी आणि आदिवासींचे मतदान निर्णायक मानले जाते. या ८९ जागांवर ३२ मतदारसंघ पाटीदारबहुल आणि १६ जागा आदिवासीबहुल आहेत. केवळ नर्मदा आणि तापी जिल्ह्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. ९ जिल्ह्यांमध्ये ५० ते ६० टक्के मतदान झाले. संपूर्ण मतदानाचा कल पाहता महानगरांमध्ये पाटीदारबहुल भागात कमी व आदिवासी भागात जास्त मतदान झाले. परंतु २०१७ च्या तुलनेत एका जिल्ह्यात जास्त मतदान झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे शहरी भागाला भाजपचा किल्ला मानला जातो. परंतु यंदा शहरातही ११% मतदान घटले आहे. केवळ पूल दुर्घटनेनंतर चर्चेत आलेल्या मोरबीमध्येही मतदानाचा टक्का कमी राहिला. येथे यंदा ६७.६५ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१७ मध्ये ७३.६६% मतदान झाले होते. २०१२ मध्ये येथे ७४.९% मतदान झाले होते.
३२ पाटीदार जागा : २०१७ मध्ये भाजपच्या जागा २१ हून १६ वर आल्या.. पहिल्या टप्प्यात एकूण ३२ जागा पाटीदारबहुल आहेत. त्यापैकी २३ जागी पाटीदार समुदाय २५ टक्के ते ५५ टक्क्यापर्यंत झाले. २०१२ मध्ये ७०.३९ टक्के मतदान झाले होते. तेव्हा भाजपने ३२ पैकी २१ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ९ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये ६५.५६ टक्के मतदान झाल्यानंतर भाजप-काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रत्येकी १६ जागी विजय मिळाला होता. यंदा ६२.९२ टक्के मतदान झाले आहे.
१६ आदिवासी जागा : १० वर्षांपासून सातत्याने मतदानात घट, भाजपने जागा गमावल्या ८९ जागांपैकी १६ आदिवासीबहुल आहेत. त्यात १४ एसटींसाठी राखीव आहेत. २०१२ पासून सातत्याने मतदानाचा टक्का घसरू लागला आहे. २०१२ मध्ये त्यावर ७८.९७ टक्के मतदान झाले होते. तेव्हा भाजपला ७, काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये ७७.८३ टक्के मतदान झाले होते. भाजपला ५, काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. यंदा या जागांवर ६९.८६ टक्के मतदान झाले आहे.
मोदींचा ३२ किमी रोड शो : भाजपच्या इतिहासात असे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील १६ जागांसाठी प्रचारसभा घेतल्या आणि रोड शो केला. अहमदाबादेत त्यांनी ३२ किलोमीटर लांब रोड शो केला. भाजपच्या इतिहासामध्ये गुजरातेत प्रथमच एखाद्या नेत्याने इतका लांब रोड शो केला आहे. हा रोड शो तीन तासांहून अधिक वेळ चालला.
२०१२ : मतदान वाढल्यामुळे भाजपच्या जागा वाढल्या होत्या
वर्ष मतदान भाजप काँग्रेस अन्य 2007 61.00%* 61 24 4 2012 72.37% 63 22 4 2017 68.38% 48 38 3 2022 62.92% - - - * २००७ नंतर हद्दवाढीमुळे अनेक जागा बदलल्या.
{एखादा मोठा मुद्दा नाही. गुजरातच्या लोकांमध्ये उत्साहदेखील नाही. रॅलीमध्ये गर्दी नाही. सरकारसाठी अँटी इन्कम्बन्सी मुद्दा. {दहा वर्षांपासून नव्या मतदारांची संख्या कमी होत चालली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदार २.३९ टक्केच वाढले आहेत. २०१७ मध्ये २.७० टक्के आणि २०१२ मध्ये ३.५% वाढले होते. {बहुतांश लोक नोकरी आणि व्यवसायामुळे इतर ठिकाणी स्थायिक झाले आहेत. ते मतदानासाठी गावाला गेले नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.