आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 63% Increase In Patients In A Month Across The Country; Over 2.25 Lakh Active Patients In Two Months

​​​​​​​कोरोनाचा वेग म्हणतो, ‘डरना जरूरी है...’:देशभरात एक महिन्यात रुग्णांत 63% वाढ; दाेन महिन्यांत सक्रिय रुग्ण 2.25 लाखांवर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जग : पॅरिसमध्ये एअरलिफ्टने रुग्णांना नेले जातेय इतर शहरांत
  • मंगळवारी गेल्या चोवीस तासांत २४ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले

देशात काेराेनाच्या नव्या रुग्णांत वेगाने वाढ हाेत आहे. मंगळवारीही गेल्या चाेवीस तासांत २४ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले. काेराेनाचा वेग पुन्हा वाढल्याचा अंदाज सक्रिय रुग्णसंख्येतील वाढीवरून सहजपणे लावता येताे. गेल्या एक महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांहून जास्त वाढ झाल्याची नाेंद झाली. महिनाभर आधी १६ फेब्रुवारीला सक्रिय रुग्णांत घट हाेऊन ते १.३८ लाख राहिले हाेते. ८ जानेवारी म्हणजे दाेन महिन्यांनंतर सक्रिय रुग्ण २.२५ लाख पार झाले. साेमवारीही सुमारे ८५ दिवसांनंतर देशात २६ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले हाेते. देशात मृत्यूचा आकडादेखील १०० हून खाली आला हाेता. आता सातत्याने १०० हून जास्त झाला आहे. मंगळवारी १३० मृत्यू झाले. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग वाढत चालला आहे. वेग वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.

ब्राझील : चौथे आरोग्यमंत्री
कोरोना काळात ब्राझीलमध्ये चौथ्यांदा आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी बदलण्यात आली. ब्राझील सरकारने कोरोनाची परिस्थिती अतिशय वाईट पद्धतीने हाताळली आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे तज्ञांना वाटते.

इटली : लॉकडाऊननंतर रुग्ण घटले
इटलीत सोमवारपासून जवळपास संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. बुधवारी येथे गेल्या २४ तासांत १५२६७ नवे रुग्ण आढळले. त्या आधी एक आठवड्यात २५ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले होते. इटलीसह युरोपमध्ये तिसरी लाट आली आहे.

फ्रान्स : रुग्णांमुळे आयसीयू भरले
फ्रान्समध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे स्थिती बिघडत चालली आहे. पॅरिसमध्ये आयसीयूच्या खाटा शिल्लक नाहीत. म्हणून रुग्णांना एअरलिफ्ट करून इतर शहरांत हलवले जात आहे. आता १०० हून जास्त रुग्णांना इतर शहरांत न्यावे लागत आहे.

सात राज्यांत ८२ टक्के मृत्यू, पंजाब दुसऱ्या क्रमांकावर
बुधवारी गेल्या २४ तासांत देशात १३१ मृत्यू झाले. त्यापैकी ८२.४४ टक्के मृत्यू केवळ सात राज्यांत झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्रात पुढे आहे. पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूमध्ये काेराेनाचे नवे रुग्ण वाढत आहेत. या पाच राज्यांत ७८ टक्के नवे रुग्ण आढळून येते.

गेल्या १५ दिवसांत सुमारे ३ लाख नवे रुग्ण, १७०० मृत्यू
मार्चमधील काेराेनाचे आकडे धाेक्याची घंटा ठरले आहेत. देशात १ मार्च ते १५ मार्चदरम्यान २,९७,५३९ म्हणजे सुमारे ३ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान १६९८ लाेकांचे काेराेनामुळे प्राण गेले आहेत. आतापर्यंत देशात एकूण १.१४ काेटी लाेकांना बाधा झाली आहे. २.२० लाख लाेकांचा मृत्यू झाला आहे.

केरळ : महिन्यात सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात घट
देशात दाेन सर्वात जास्त रुग्ण असलेल्या राज्यांचा ट्रेंड काहीसा उलट दिसून येताे. महाराष्ट्रात वेगाने रुग्ण वाढू लागले आहते. केरळमध्ये मात्र रुग्ण वाढीवर वेगाने नियंत्रण मिळवले जात आहे. गेल्या एक महिन्यात केरळमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसते. केरळसाेबत आेडिशानेही रुग्ण नियंत्रणात यश मिळवले आहे.

महाराष्ट्र: गेल्या एक महिन्यात साडेतीन पटीने रुग्णांत वाढ
महाराष्ट्रात या वेळी सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले. सुमारे ६५ टक्के नवे रुग्ण राज्यात आहेत. गेल्या एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या साडेतीन पटीने वाढली. १६ फेब्रुवारीला येथे ३७१२५ सक्रिय रुग्ण आढळून आले हाेते. ते वाढून १५ मार्चपर्यंत १.३० लाखावर गेले. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७० टक्के महाराष्ट्रातील आहेत.

बातम्या आणखी आहेत...