आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्येही उत्तराखंडसारखी भीती:लाहौल स्पीतीमध्ये 65 हिमकड्यांचे 360 तलावांमध्ये रुपांतर, आकार 50 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त

मंडी/उज्जैन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तलावांवर लक्ष ठेवण्याची गरज

हिमकड्याचे नाव ऐकताच केदारनाथमध्ये झालेली दुर्घटना आठवते. नुकतच उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हिमकडा कोसळून केदारनाथच्या जखमा ताज्या केल्या. आता अशाच प्रकारची दुर्घटना हिमाचलमध्येही येऊ शकते. हा दावा उज्जैनचे डॉ. अंकुर पंडित यानी केला आहे. त्यांनी IIT मुंबईमध्ये हिमकड्यांवर अनेक वर्षे अभ्यास केला आहे. सतत बनत असलेल्या हिमकड्यांच्या आकारासह इतर माहिती गोळा करण्यासाठी पंडित यांनी ग्लेशियर (हिमाचल) मध्ये जाऊन जीपीआर सर्वेदेखील केला आहे.

सॅटेलाइटने मिळालेल्या फोटो आणि कंप्यूटेशन मॉडलिंगमधून समोर आले आहे की, वातावरणातील बदलामुळे लाहौल स्पीती क्षेत्रातील चंद्रा घाटीत 65 हिमकड्यांवर येणाऱ्या काळात 360 लहान-मोठे तलाव तयार होतील. यांचा एकूण एकार 49.56 चौरस किलोमीटरपर्यंत असू शकतो. यामुळे येणाऱ्या काळात मोठा प्रलय येऊ शकतो.

मनालीपासून 40 किलोमीटर दूर सिस्सू गाव आहे. या गावाच्या वर डोंगरांमध्ये एत तलाव आहे, त्या तलावाच्या आसपास हिमकडा तयार झाला आहे. या हिमकड्याचे पाणी वितळल्यावर तलावात जमा होईल आणि त्यातून खाली येईल. यामुळे सिस्सू गावात असलेल्या 20 हजार लोकांना धोका आहे.

तलावांवर लक्ष ठेवण्याची गरज

डॉ. अंकुर यांनी पुढे सांगितले की, ‘आम्हाला 2013 मध्ये केदारनाथमध्ये झालेल्या दुर्घटनेतून धडा घेऊन हिमालय क्षेत्रात तयार होत असलेल्या तलावांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. शोधात सांगितलेल्या माहितीच्या आधारे येणाऱ्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल. या तलावांवर लक्ष ठेवण्यासाटी सॅटेलाइट फोटोंचा वापर करता येऊ शकतो. सॅटेलाइट फोटो देण्यात इस्रो आणि इतर संस्था मदत करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...