आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडून उपयोगात नसलेले कायदे हटवण्याचे काम:तांब्याची तार ठेवल्यावर कैदेसह 65 कायदे रद्द करण्यात येणार

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार ६५ जुने आणि अप्रचलित कायदे रद्द करण्याच्या तयारीत आहे. या कायद्यांच्या यादीत असे काही कायदेही आहेत,जे आता तर्कसंगत नाहीत. उदाहरणार्थ, एक कायदा असाही आहे, ज्यात कुणाकडे तांब्याच्या तारेचा छोटा तुकडा सापडल्यावर त्याची ५ वर्षे तुरुंगात रवानी केली जाते. ६५ कायद्यांच्या यादीत एक कायदा असाही आहे, जो १३५ वर्षे जुना आहे. कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी नुकतेच एका भाषणात ही बाब सांगितली. हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकार आपल्या आगामी अधिवेशनात सादर करेल. सूत्रांनुसार रद्द करावयाच्या कायद्यांच्या तीन श्रेणी केल्या आहेत. यापैकी १६ कायद्यांत दुरुस्ती केली आहे. हे कायदे सध्याच्या काळात उपयोगी नाहीत. दुसऱ्या श्रेणीत २०१३ पासून २०१७ दरम्यान बनवलेल्या ४० विनियोग कायद्यांना ठेवले आहे. तिसऱ्या श्रेणीत केवळ एक कायदा ठेवला आहे. त्यात दुरुस्तीच्या माध्यमातून केवळ एका शब्दाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. याचे नाव फॅक्टरिंग विनियमन अधिनियम २०११ आहे.

बातम्या आणखी आहेत...