आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 65 Railway Officers Travel Without Ticket In 'Vande Bharat'! Free Officers In Bilaspur To Nagpur Railway

फुकटे अधिकारी:रेल्वेच्या 65 अधिकाऱ्यांचा ‘वंदे भारत’मध्ये विनातिकीट प्रवास! बिलासपूर ते नागपूर रेल्वेतील प्रकार

अनुपम सिंह | बिलासपुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर ते नागपूरदरम्यान डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत रेल्वेचेच ६५ अधिकारी विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत. काही अधिकारी कुटुंबीयांसोबत प्रवास करतानाही दिसले. रेल्वेच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते.

झोन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कदाचित नियम माहीत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांनी प्रवास केला असावा. म्हणून त्यांना दंड केला जाईल. झोनच्या पीसीसीएमनी ज्या विभागात हे अधिकारी काम करतात त्या विभागांना पत्र पाठवून चौकशी व कारवाई करण्यास सांगितले आहे. असे सर्व अधिकारी वरिष्ठ प्रशासकीय ग्रेडच्या खालच्या रँकचे आहेत. बिलासपूर ते नागपूर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. ही रेल्वे बिलासपूर ते नागपूर हे अंतर साडेपाच तासांत पार करते. बिलासपूरनंतर रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया येथे थांबते.