आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे ६६ कोटींहून अधिक डोस खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. आजवर सरकारची ही सर्वात मोठी ऑर्डर असून हे डोस याच वर्षी ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सरकारला मिळतील. महत्त्वाची बाब म्हणजे हे डोस सुधारित दराने खरेदी केले जातील. यात कोविशील्ड २०५ आणि कोव्हॅक्सिन २१५ (विनाकर) रुपयांना मिळेल. करांसह कोविशील्डच्या एका डोसची किंमत २१५.२५ रुपये तर कोव्हॅक्सिन २२५.७५ रुपये आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत दोन्ही लसी १५० रुपये प्रतिडोस दराने खरेदी केल्या आहेत. आता १४,५०५ कोटी रुपयांची नवीन ऑर्डर दिल्याने लस तुटवड्याची तक्रार करणाऱ्या राज्यांना दिलासा मिळणार आहे.
वाढलेल्या दरांचे गणित
सरकारने १७ जुलैपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दोन्ही लसींचे ४१.६९ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत. तर २.७४ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. नवीन ऑर्डरनुसार सरकारने कोविशील्डच्या ३७.५ कोटी डोससाठी ८,०७१ कोटी आणि कोव्हॅक्सिनच्या २८.५ कोटी डोससाठी ६,४३३ कोटी रुपये दिले. जर जुन्या दराने हे डोस दिले गेले असते तर ही रक्कम ९,९०० कोटी रुपये झाली असती. केंद्र सरकारला ४,६०५ कोटी जास्तीचे द्यावे लागले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.