आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
IIT मद्रासमधील 66 विद्यार्थी आणि 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशावरुन फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इंस्टीट्यूट 7 डिसेंबरला उघडण्या आले होते. आता हे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व डिपार्टमेंट बंद करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, कॅम्पसमध्ये सुरुवातीचे दोन रुग्ण 1 डिसेंबरला आढळले होते. यानंतर 10 डिसेंबरला काही जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज फक्त तीन दिवसात 55 रुग्ण वाढले. सध्या कॅम्पसमध्ये 774 विद्यार्थी असून, त्यांना बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वात जास्त रुग्ण कॅम्पसमधील कृष्णा आणि जमुना हॉस्टेलमधील आहेत. याशिवाय काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आयआयटी कॅम्पसला सध्या कोविड हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.