आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्याविरुद्ध येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकचे व्यावसायिक सुशील भालचंद्र पाटील यांनी वैभव यांच्यावर पर्यटन विभागात ई-टॉयलेटसह सरकारी विभागांमध्ये टेंडर देण्याच्या नावाखाली ६.८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्य आरोपी गुजरात काँग्रेसचे सचिव सचिन पुरुषोत्तम वालेरा, वैभवसह १४ विरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. एफआयआरनुसार, सचिन वालेराने राजस्थानचे सीएम आणि त्यांच्या मुलाशी चांगल्या संबंधाचा दावा करत कामात गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा नफा कमावण्याचे आमिष दाखवले. यावर त्यांनी सचिनने सांगितलेल्या बँक खात्यांत ६.८० कोटी रु. ट्रान्सफर केले. काही काळ गुंतवणुकीवर मासिक रिटर्न मिळाला, मात्र नंतर बंद झाला. सचिनने पर्यटन विभागाच्या ज्या टेंडर्सची कागदपत्रे दाखवली, ती तपासणीअंती बनावट दिसली. वैभव यांनी अशा कोणत्याही प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगत आरोप चुकीचा ठरवला. आपल्याला फसवले जात असल्याचे वैभव यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.