आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वेक्षण:एप्रिलमध्येच शाळा उघडा; 69 टक्के पालकांची इच्छा, 56 टक्के पालकांचे मत सध्याच लस टोचू नये

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणत्या राज्यात कधीपासून उघडल्या शाळा

देशात कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यातल्या त्यात लसदेखील आल्याच्या बातम्यांनी मुलांच्या शाळा आता नवीन वर्षात सुरू उघडायला हव्यात, असे देशभरातील पालकांना वाटते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. देशातील २४४ जिल्ह्यांत लोकल सर्कल या स्वतंत्र संस्थेने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात १९ हजार लोकांचे मत नोंदवण्यात आले. या सर्वेक्षणात ६९ टक्के पालकांना सेमिस्टर (एप्रिल-२०२१) मध्ये शाळा उघडल्या पाहिजेत, असे वाटते तर ३४ टक्के पालकांना सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करावीशी वाटते.

सर्वेक्षणात लोकांना याविषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले, त्यात टिअर वनचे ५८, टिअर टू, थ्री आणि फोरमध्ये २१-२१ टक्के लोकांना प्रश्न विचारण्यात आले. यात ६९ टक्के पालक म्हणाले, पुढच्या सत्रात मुलांच्या शाळा उघडल्या पाहिजेत, तर २३ टक्के पालक म्हणाले, जानेवारीपासूनच शाळा उघडल्या पाहिजेत. पाच टक्के पालकांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

दुसरीकडे शाळा सुरू होण्याआधी मुलांना लस टोचण्यात यावी, असे २६ टक्के पालकांना वाटते. तर सध्या लस टोचू नये आणि कमीत कमी तीन महिने आणखी वाट पाहावी, असे ५६ टक्के पालकांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, व्हॅक्सिनेशनचा आकडा आल्यावरच मुलांना लस टोचायला हवी, तर १२ टक्के पालक मुलांना लस टोचण्याच्या विरोधात आहेत. ६ टक्के पालक म्हणाले, यावर आम्ही काहीच सांगू शकत नाही. लोकल सर्कल एक स्वतंत्र संस्था आहे, ती शिक्षण, आरोग्य आणि इतर विषयांवर देशभरात सर्वेक्षण करत असते. अनेक मंत्रालयासाठी डेटा गोळा करण्याचे कामही करत असते.

कोणत्या राज्यात कधीपासून उघडल्या शाळा
मध्य प्रदेश : १८ डिसेंबरपासून १०वी, ११वी आणि १२वीच्या िवद्यार्थ्यांसाठी सर्वच खासगी-सरकारी शाळा उघडल्या.
राजस्थान : ४ जानेवारीपासून ६वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा उघडल्या.
बिहार : ४ जानेवारीपासून सर्वच शाळा आणि कोचिंग सेंटर्स उघडतील
महाराष्ट्र : ९ ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ जानेवारीपासून शाळा उघडतील.
झारखंड : डिसेंबर २०२० मध्येच १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा उघडण्यात आल्या.
कर्नाटक : १ जानेवारीपासून १०वी आणि १२वीच्या शाळा उघडल्या.
दिल्ली : सरकारने जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचे जाहीर केले आहे.
आसाम : १ जानेवारीपासून शाळा उघडतील.
ओडिसा : ८ जानेवारीपासून सर्वच शाळा उघडणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...