आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 7 Accused, Including Two Doctors And Nurse Arrested In Case Of Remedesiver, Fake Injection And Black Marketing, Used To Make Powder Of Second Drug In Empty Vial Of Remedesvir Injection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट रेमडेसिवीर रॅकेटचा भांडाफोड:25 रुपयांमध्ये बनावट इंजेक्शन तयार करुन 30-35 हजार रुपयांना विकायचे, दोन डॉक्टरांसह सातजण ताब्यात

रतलाम11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नर्स बहीण रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या द्यायची, भाऊ अँटीबायोटिक भरुन दलालांना 8 हजारांना विकायचा
  • दलालांकडून हेच बनावट रेमडिसिवीर इंजेक्शन रुग्णांना 30-35 हजार रुपयांना मिळायचे

मध्यप्रदेशातील रतलाममध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. एक तरुण आपल्या नर्स बहिणीसोबत मिळून हे रॅकेट चालवायचे. बहिण मेडिकल कॉलेजमधून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या द्यायची. भाऊ त्यात सामान्य अँटीबायोटिक सेफ्ट्रिक्सोन पाउडर टाकून विकायचा.

मिळालेल्या माहितीनुसार, हे इंजेक्शन दलालांना 6 ते 8 हजार रुपयांना विकायचा. यानंतर, दलाल हे बनावटी इंजेक्शन ग्राहकांना/रुग्णांना 30 ते 35 हजार रुपयांना विकायचे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात रतलामच्या जीवांश हॉस्पिटलचे डॉक्टर उत्सव नायक, डॉक्टर यशपाल सिंह, मेडिकल व्यवसायी प्रणव जोशी, मेडिकल कॉलेजची नर्स रीना प्रजापती, रीनाचा भाऊ पंकज प्रजापती, जिल्हा रुग्णालयात पावती बनवणारा गोपाल मालवीय आणि रोहित मालवीय सामील आहेत.

असा झाला खुलासा

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, या हॉस्पीटलमध्ये बनावट इंजेक्शनची विक्री होणार आहे. यानंतर शनिवारी रात्री जीवांश हॉस्पिटलबाहेर दबा देऊन बसलेल्या पोलिसांनी ड्यूटीवर असलेल्या दोन डॉक्टरांना 30 हजार घेऊन इंजेक्शनची डिलीव्हरी देताना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी डॉक्टर उत्सव नायक आणि डॉक्टर यशपाल सिंहला अटक केली. चौकशीत झालेल्या खुलाशात फरार आरोपी प्रणव जोशीला मंदसौरमधून अटक केले. यानंतर मेडिकल कॉलेजची नर्स रीना प्रजापती, तिचा भाऊ पंकज प्रजापती, गोपाल मालवीय आणि रोहित मालवीयच्या नावांचा खुलासा झाला. यानंतर सोमवारी पोलिसांनी या चौघांना अटक केले.

बातम्या आणखी आहेत...