आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोपाळ:मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सोलापुरातील घरातून 7 कोटी जप्त

भोपाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस आमदार नीलय डागा यांच्या महाराष्ट्रातील साेलापूर येथील घरातून प्राप्तिकर विभागाने ७.५० काेटी रुपये राेख हस्तगत केले. डागा आणि त्यांच्या बंधूंकडे तीन दिवस छापेमारी सुरू होती. शनिवारी रात्री एक वाजता सोलापूरमध्ये डागा यांचा एक कर्मचारी बॅग घेऊन पळण्याच्या प्रयत्नात असताना पकडला गेला. ती बॅग नोटांनी भरली होती. यानंतर त्याच ठिकाणावरून तशीच दुसरी बॅगही आढळली. नोटांची जास्त संख्या बघून नोटा मोजणारे यंत्र वापरावे लागले. ही रक्कम साडेसात कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. हे पैसे कोठून आले हे डागा बंधू सांगू शकले नाहीत. प्राप्तिकर विभागाने ते जप्त केले आहेत. रक्कम जास्त असल्याने सोलापुरात दोन बँकांच्या शाखा रविवारीही उघडण्यात आल्या.

शंभर कोटींचा व्यवहार
डागा यांच्या कंपन्यांनी हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवले व मागवल्याचे पुरावे प्राप्तिकर विभागाला मिळाले. अनेक शहरात व विदेशातही पैसे पाठवल्याचा संशय आहे. मोठे व्यवहारही रोख स्वरूपात करण्यात आले. हा व्यवहार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते.