आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडे खेळाडू ‘फ्लॉप’, स्वस्तातले ‘हिट’:7 दिवस..5 संघ..8 सामने..सामन्यात सरासरी 322 धावा

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) म्हणजे महिलांच्या आयपीएलला सुरू होऊन आठवडा झाला. सात दिवसांच्या विश्लेषणानुसार जास्त किमतीच्या खेळाडू फ्लॉप व कमी किंमत असलेल्या खेळाडू हिट ठरल्या. महागडी खेळाडू स्मृती मानधना (३.२० कोटी रुपये), ४ सामन्यांत केवळ ८० धावा काढल्या. एक धाव सुमारे ४ लाख रुपयांना पडली. १० लाखांत मुंबईची सायका इशाक यशस्वी गोलंदाज ठरली.

किंमत मोठी..नुकसानही मोठे स्मृती मानधना (~3.4 कोटी) - फलंदाज {बंगळुरूची कर्णधार, ४ सामने गमावले. २० च्या सरासरीने एकूण केवळ ८० धावा. दीप्ती शर्मा (~2.6 कोटी) - गोलंदाज. {यूपीसाठी ३ सामन्यांत २ विकेट. रिचा घोष (~1.9 कोटी)- यष्टिरक्षक. {४ सामने, ४१ धावा, २ स्टंपिंग, 1 झेल. अॅश्ले गार्डनर (~3.2 कोटी) - अष्टपैलू. {3 सामने, ४४ धावा, ४ विकेट घेतल्या.

मेग लेनिन (~1.1 कोटी) - फलंदाज {दिल्लीकडून ३ सामन्यांत ६२ च्या सरासरीने सर्वाधिक १८५ धावा केल्या. साइका इशाक (~10 लाख) - गोलंदाज {मुंबईसाठी ३ सामन्यांत ९ विकेट एस. भाटिया (~‌1.5 कोटी) - यष्टिरक्षक {3 सामने, ६५ धावा, १ झेल, २ स्टंपिंग. हेली मॅथ्यूज (‌~10 लाख) - अष्टपैलू {3 सामन्यांत १५६ धावा, ६ विकेट.

{पहिल्या आठवड्यात ८ सामने, पैकी २,५७७ धावा, ९३ बळी. प्रतिसामना सरासरी ३२२ धावा, १२ बळी. {एकूण २२ सामने. {२० सामन्यांनंतर टॉपर संघ थेट अंतिम फेरीत जातील. दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील विजेता संघ अंतिम सामना खेळेल. {26 मार्चला अंतिम सामना

बातम्या आणखी आहेत...