आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 10 Killed In Fire At Covid 19 Facility In Vijayawada; Possibility Of Fire Due To Short Circuit

आंध्रप्रदेशात दुर्घटना:विजयवाडात कोविड-19 सुविधा केंद्रात भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; 40 लोकांवर उपचार सुरू होते

विजयवाडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलचा कोविड-19 सेंटर म्हणून वापर करण्यात येत होता. येथे घटनेवेळी 40 रुग्ण होते. सोबत मेडिकल स्टाफचे 10 लोक देखील होते. ही आग एलुरु रोडवरील हॉटेल स्वर्ण पॅलेसमध्ये लागली. रमेश हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने कोरोना असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी हे हॉटेल भाड्याने घेतले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की, आंध्राचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना शक्य ती मदत केली जाईल. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 50-50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

कृष्णा जिल्ह्याचे आयुक्त मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, सदरील घटना पहाटे 5 वाजता घडली. यानंतर संपूर्ण इमारतील खाली करण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची त्यांनी शक्यता वर्तवली.

6 ऑगस्ट रोजी अहमदाबादच्या कोविड रुग्णालयातील आगीत 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता

गुरुवारी अहमदाबादच्या श्रेय कोविड रुग्णालयात आग लागली होती. या दुर्घटनेत 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयाचे ट्रस्टी भारत महंत आणि एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

संक्रमणाच्या बाबतीत आंध्र प्रदेश देशात तिसऱ्या क्रमांकावर

संसर्गाच्या बाबतीत आंध्र प्रदेश देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 2.17 लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील 85 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरू असून 1 लाख 29 हजार 615 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात 1 हजार 939 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...